Advertisement

हा काय टीजर होता का?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

आजचा काय टीजर होता का ? सस्पेन्स कसला ठेवताय? असा खोचक सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

हा काय टीजर होता का?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
SHARES

आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीय. पण येत्या २ दिवसांत मला दृष्य स्वरूपात फरक दिसला नाही, तर कडक निर्बंध लावावेच लागतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला अल्टिमेटम दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना हा आजचा काय टीजर होता का ? सस्पेन्स कसला ठेवताय? असा खोचक सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

आज मी पूर्ण लॉकडाऊन घोषित नाही करत पण इशारा देतो. हे काय आहे. लॉकडाऊनला पर्याय अजूनही मिळालाच नाही, मग इतकी हवा कसली तयार केली. गांजलेल्या जनतेला आज ठोस निर्णयाची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली.

आता अजून कुणाशी चर्चा करणार आहात, घ्या की निर्णय.. .नेहमीप्रमाणेच या बाबतीतही  निर्णय दिरंगाई. इतक्या महिन्यांत जे नाही झालं ते पुढच्या २ दिवसांत काय मोठा चमत्कार घडणार आहे. अहो सत्य परिस्थिती, वास्तव काय समोर मांडताय.. त्याची सर्वाधिक झळ तर आम्हाला बसतेय. या वास्तवाला जबाबदार कोण ? चिंताजनक दिशेने तुम्हीच तर ढकललं. कोरोनाचे अवतार सांगताय, पण सरकारचा खरा अवतार जनतेला दिसला, अशा शब्दांत केवळ उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

हेही वाचा- तर कडक निर्बंध लावावेच लागतील, मुख्यमंत्र्यांनी दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाॅकडाऊन आणि कडक निर्बंधावरून सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. 

परिस्थिती आटोक्यात आल्यावर मधल्या काळात आपण शिथिलता आणताच लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. कोरोना गेला, अशा रितीने सगळं सुरू होतं. दुर्दैवाने जी भीती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप धारण करून कोरोना आला आहे. आपण एका कात्रीत सापडलो आहोत. अर्थचक्र चालवायचं, तर अनर्थ ओढवतोय. अनर्थ टाळायचा, तर अर्थचक्र थांबतंय. 

मला वेगळा उपाय हवाय. ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय मिळाला नाही किंवा २ दिवसांत मला दृष्य स्वरूपात फरक दिसला नाही, तर काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही. जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा