Advertisement

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प LIVE: शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद


SHARES

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात:

महाराष्ट्र राज्याचा सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरूवात केली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या हिताचा असंल, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्प सादर करण्याअगोर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधानभवनाकडे रवाना झाले.


३.४३ जीएसटी नुकसान भरपाईपोटी राज्यातील सर्व महापालिकांना आतापर्यंत ११ हजार ४६० कोटी रुपये अदा

३.४१ १ जुलै २०१७ पासून जीएसटी राज्यात लागू झाली असून करदात्यांमध्ये लक्षणीय वाढ, ५ लाख ३२ हजार नवे करदाते, एकूण करदाते १३ लाख ६२ हजार

३.२६ शासकीय संदेश, सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी टोल फ्रि क्रमांक सुरू करणार, शेतकऱ्यांनाही त्यांच्यासाठी योजनांची माहिती देणार

३.३३ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार, त्यासाठी अहवाल तयार करण्यात येत असून हा अहवाल आल्याबरोबर सातवा वेतन आयोग लागू करणार

३.३१ मच्छिंद्र कांबळी यांचं सिंधुदूर्ग येथे स्मारक उभारणार, आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार, सिंदधुदूर्ग जिल्ह्यात मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद

३.३० अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच्या अनुदानात दुप्पटीने वाढ, अनुदान २५ लाख रुपयांवरून ५० लाख रुपयांपर्यंत, त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद

३.२६ गणपतीपुळे या पर्यटनस्थळाच्या विकासाला आणि पर्यटनाला चालनासाठी ७९ कोटीचा विकास आराखडा प्रस्तावित, त्यानुसार आवश्यक तो निधी पुरवणार

३.२२ पंतप्रधान आवास योजनेसाठी ग्रामीण भागात १ हजार ७५ कोटी ५० लाख इतकी तरतूद, तर शहरी भागांसाठी ४ लाख घरांचं नियोजन, १ हजार ४० कोटी तरतूद

३.१७ कुपोषण निमूर्लनातंर्गत गरदोर महिलांसाठी विशेष योजना, बालकांना आठवड्यातून ४ दिवस अंडी आणि केळी उपलब्ध करून देणार

३.१६ राजश्री शाहू महाराज प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, ५ कोटी निधी राखीव, आवश्यकतेनुसार निधीत वाढ

३.१४ दिव्यांगाना स्वावलंबी बनवण्यासाठी पर्यावरणस्नेही मोबाईल स्टाॅल, या योजनेसाठी २५ कोटींची तरतूद

३.१३ श्रावण बाळा योजनेतील निवृत्ती वेतनात वाढ

३.१२ दारीद्र्य रेषेखालील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना यासाठी १ हजार ६८७ कोटी तरतूद

३.१२ स्कील इंडियासाठी राज्यातील १५ ते २५ वयोगटातील मुलांना कौशल्य प्रशिक्षण देणार

३.११ घनकचरा व्यवस्थापनासाठी १ हजार ५२६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

३.१० सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी ३३५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

३.१० कुपोषणावर मात करण्यासाठी २१ कोटी १९ लाख तरतूद

३.०६ गरीब गर्भवती महिलांसाठी ६५ कोटींची तरतूद, शेवटच्या महिन्यांपर्यंत गरीब गर्भवती महिलांना काम करता येत नाही, त्यासाठी प्रत्येक गरीब गर्भवती महिलेला ५ हजार रुपये देणार

३.०८ वृक्षलागवड महामोहिम सुरूच राहणार, ५ कोटी ४३ लाख वृक्ष लागवड आतापर्यंत केली, यापुढे ३३ कोटी वृक्षलागवडीचं उद्दीष्ट, आवश्यक तो निधी प्रस्तावित

३.०४ स्मार्टसिटीअंतर्गत राज्यातील कल्याण-डोंबिवलीसह ८ शहरांची निवड, १ हजार ३०० कोटी निधी प्रस्ताव

३.०४ महाराष्ट्रात ३०० मेगावॅट विजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करणार

३.०३ गृह विभागाच्या विकासासाठी १३ हजार ३८५ कोटी रुपयांची तरतूद

३.०२ कंपोस्ट खताच्या विक्रीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर अनुदानासाठी ५ कोटींचा निधी राखीव

३.०० सर्व शहर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान केंद्रानं सुरू केल आहे. त्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान, राज्यातील सर्व शहरे हागणदारी मुक्त करणार

२.५९ राज्यातील सर्व पोलिस ठाणे सीसीटीव्हीने जोडणार

२.५६ दीड लाख हेक्टवर संत्री उत्पादन, संत्रा उत्पादनाला चालनासाठी १५ कोटींचा निधी राखीव

२.५६ पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी १३ हजार ३८५ कोटी ३ लाख इतकी भरीव तरतूद

२.५४ हस्तकला उद्योग, पारंपारिक हस्तकला टिकवण्यासाठी, विक्रीस चालना देण्यासाठी, त्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी ४ कोटी २८ लाखांची तरतूद

२.५३ कृषीपंपाना १२ तास वीज पुरवठा, राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा

२.५० ७ हजार किमी रस्त्यांसाठी २२५५ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची तरतूद

२.४९ समुद्र किनाऱ्यावरील घारापुरीत पहिल्यांदा वीज पुरवली, वीत वितरणासाठी एकूण २२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

२.४८ ३ वर्षांत ४५०९ किमीवरून १५ हजार ४०४ किमीचे राष्ट्रीय महामार्ग बनवले

२.४६ सागर मार्ग कार्यक्रमांतर्गत ११ प्रकल्प हाती, तर २३ प्रकल्प मंजुरीसाठी सादर, भाऊचा धक्का ते मांडवा एप्रिल २०१८ मध्ये सुरू

२.४३ वर्सोवा-वांद्रे सी लिंकच्या कामास मंजुरी

२.४२ मुंबई-नागपूर सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची ६४ टक्के प्रक्रिया पूर्ण, प्रकल्पाचे काम एप्रिल २०१८ सुरू होणार, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

२.३८ एकूण २६६ लांबीच्या मेट्रो आराखड्यास मंजुरी, येत्या तीन-चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस, ६७ लाख मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल.

२.३६ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरूषांचं साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू करणार, यासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

२.३५ मानव विकास मिशनसाठी ३५० कोटींची तरतूद, न्यायालयीन इमारतीसाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद

२.३३ राज्यातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार, त्यासाठीही विशेष तरतूद

२.२९ पदवीधर तरुणांसाठी विविध प्रकराच्या भरतीतील प्रमाण वाढवणं गरजेचं, प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार, त्यासाठी ५० कोटींची तरतूद

२.२७ चौथा अर्थसंकल्प सादर करणारे सुधीर मुनगंटीवार चागलेच फार्मात, कविता आणि शेरोशायरीच्या अंदाजात अर्थसंकल्प सादर

२.२६ ६०९ एसटी बसस्थानकांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय. त्यासाठी अर्थसंकल्पात एकूण ४० कोटी रुपयांची तरतूद

२.२६ समृद्धी महामार्गालगत शीतगृह, गोदाम उभारण्याची घोषणा

२.२५ एसटी महामंडळाच्या माध्यमातून मालवाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय. याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन एसटीचं उत्पन्न वाढणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. यामुळे आर्थिक कोंडीत साडलेल्या एसटी महामंडळाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

२.२१ वनशेतीस प्राधान्य देण्यासाठी १५ कोटी, सेद्रींय शेतीसाठी १०० कोटींची तरतूद

२.१६ शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी रास्त भाव मिळावा यासाठी एपीएमसीमध्ये धान्य चाळणी यंत्र बसवणार

२.१३ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १५०० कोटीची तरतूद

२.१२ सूतगिरण्यांना प्रतियुनिट ३ रुपये दराने वीज

२.११ शेतकऱ्यांचं  उत्पन्न दुप्पटीनं वाढवणार

२.०९ लघुउद्योगांसाठी १०० कोटी अनुदान

२.०८ एमटीएचसाठी १७ हजार कोटीचा खर्च करणार

२.०७ २०१७-१८ मध्ये ९३ हजार २८३ टन अन्नधान्याच्या उत्पादनाचा अंदाज

२.०६ नवी मुंबई विमानतळाच्या एका धावपट्टीचं काम डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण,

२.०२ प्रस्तावित आंबेडकर स्मारकासाठी १५० कोटी रुपयांची तरतुदी

२.०२ ३०० कोटी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकारासाठी तरतुदी, निविदा अंतिम

२.०१ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चौथा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा