मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020 Live updates) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (finance minister ajit pawar) यांनी शुक्रवारी सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असून राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 6, 2020
राज्याबाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांमुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा येत असल्याची तक्रार सातत्याने होताना दिसते. राज्यभरातील एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात लहान-मोठे उद्योगधंदे व कंपन्या आहेत. यामध्ये परप्रांतीय कामगारांना रोजगार दिला जात असल्याने स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारासाठी वणवण फिरावं लागतं. त्यामुळे राज्यातील सर्वच खासगी कंपन्या, आॅफिसांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावं, अशी मागणी वेळोवेळी कामगार संघटना, पक्षांकडून होते. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बेरोजगार तरूणांना रोजगारक्षम बनवणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. १० वी उत्तीर्ण झालेल्या २१ ते २८ वयोगटातील तरूणांना रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तर, उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्याची तरतूद त्यांनी केली. स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळाव्यात म्हणून कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.