Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्य गुप्तचर विभागाचे (एसडीआय) आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या धमकीची पुष्टी दिली आणि सांगितले की, त्यांना शनिवारी संध्याकाळी सीएम शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली.

मुंबई पोलिसांनी या धमकीचा शोध सुरू केला आहे. हा धमकीचा कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले असून, ज्या क्रमांकावरून कॉल आला होता, त्यावर पाळत ठेवण्यात आली आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे, त्याचबरोबर शिंदे यांचे ठाणे येथील खाजगी निवासस्थान आणि मुंबईतील वर्षा यांच्या शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

महिनाभरापूर्वी धमकीचे पत्र आले होते. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे. आता महिनाभरानंतर हा धमकीचा फोन आला आहे. पत्रे आणि कॉल्सनंतर आता राज्यात सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

"सार्वजनिक जीवनात काम करत राहीन"

धमकी आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, "मी त्याकडे लक्ष देत नाही. आमचे गृह खाते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. अशा धमक्यांना मी घाबरणार नाही, कोणीही घाबरणार नाही. मला जनतेसाठी काम करण्यापासून कोणी थांबवू नाही शकत. मी त्यांच्यासाठी काम करत राहिन."हेही वाचा

शिंदे-फडणवीस सरकार येताच महाराष्ट्रातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिंदे गटाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष फोडण्याचा प्रयत्न : संजय नाईक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा