Advertisement

शिंदे गटाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष फोडण्याचा प्रयत्न : संजय नाईक

मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी थेट शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.

शिंदे गटाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष फोडण्याचा प्रयत्न : संजय नाईक
SHARES

शिंदे गटाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप मनसे (MNS) सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. शिंदे गट देखील आगामी निवडणुकीत सज्ज झाला आहे. याचदरम्यान, मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी थेट शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.

मनसेने 'एकला चलो रे' नारा दिल्यावर मनसे फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना विविध आमिषे दिले जात आहेत, असा गंभीर आरोप नाईक यांनी केला आहे.

मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय नाईक म्हणाले, ' आमच्या भायखळ्यात मनसे पदाधिकाऱ्यांना घरी जाऊन त्यांना कार्यालयात बोलावून चांगले पद देतो अशाप्रकारे विविध आमिषे दाखवली जात आहेत. सदर बाब कळल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांची किव येते'.

'दुर्दैवाने शिंदे गट एक शत्रू समोर असताना आणखी किती शत्रू करू पाहताहेत? हे त्यांना कळलेलं नाही. त्यांनी लढताना त्यांना किती मित्र हवेत आणि किती शत्रू हवेत याची जाण असायला हवी. मला हे चुकीचं वाटतंय. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इतर नेते त्याला गालबोट लावत आहेत, असा गंभीर आरोप करत संजय नाईक यांनी शिंदे गटांच्या नेत्यांवर टीका केली आहे.



हेही वाचा

सत्तासंघर्षाच्या वादानंतरही रश्मी ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंच्या नवरात्री मंडपाला भेट

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा