राष्ट्रवादीच्या बैठकीला ५० आमदार उपस्थित

सकाळपासून अज्ञात वासात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क करून शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे हे त्यांना पकडून राष्ट्रवादीच्या बैठकीला आणत आहेत.

SHARE

राज्यात  राजकिय घडामोडींना वेग आला असताना. अजित पवार यांनी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घडामोडींनंतर पवारांनी अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली. राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरू असताना. अजित पवारांसोबत गेलेले आमदार आता पून्हा पक्षाच्या बैठकांना उपस्थित रहात आहेत. सध्याच्या बैठकीत राष्ट्रवादीचे ५० आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीची बैठक सुरू असून या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळें याचबरोबर गायब असलेले धनंजय मुंडे हेदेखील हजर आहेत. या बैठकीआधी खासदार सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील व हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. अज्ञातवासात असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना पून्हा आणण्यासाठी शिवेसेनेचे नेते प्रयत्न करत आहेत. सकाळपासून अज्ञात वासात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांच्याशी संपर्क करून शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे हे त्यांना पकडून राष्ट्रवादीच्या बैठकीला आणले.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या