Advertisement

“मी निर्णय घेण्याआधी तूच निर्णय घे”, संजय राठोड यांचा राजीनामा निश्चित?

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे.

“मी निर्णय घेण्याआधी तूच निर्णय घे”, संजय राठोड यांचा राजीनामा निश्चित?
SHARES

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही. तर त्यांनी सूचक शब्दांत राठोड यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचीही चर्चा सुरू आहे. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरू आधीच विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात असताना पोहरादेवी इथं संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळं राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. एका बाजूला मुख्यमंत्री जनतेला गर्दी न करण्याचं आवाहन करत असताना, शिवसेनेचाच मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना हरताळ फासत असल्याचं शक्तीप्रदर्शनामुळे दिसून आलं.

हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: प्रवीण दरेकरांचे सरकारला १२ प्रश्न

त्यामुळं मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राठोड यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राठोड यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधक भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी केलेली असल्याने राठोड यांचा राजीनामा घेऊन विरोधकांच्या हल्ल्याची धार कमी करता येऊ शकते, असं काही मंत्र्यांचं मत आहे.

मंत्रीमंडळ बैठकीच्या आधी बुधवारी संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना तब्बल दीड तास बसवून ठेवलं आणि त्यानंतर अवघे काही मिनिटं संवाद साधत मी निर्णय घेण्याआधी तूच निर्णय घे, अशा सूचक शब्दांत राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचं म्हटलं जात आहे. 

त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी संजय राठोड मंत्रीपदाचा राजीनामा देतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

(maharashtra cm uddhav thackeray directs ranjay rathod to resignation)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा