Advertisement

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' सूचना

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीमध्ये देखील शासनाची बाजू अशीच भक्कमपणे मांडावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला केल्या.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' सूचना
SHARES

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीमध्ये देखील शासनाची बाजू अशीच भक्कमपणे मांडावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला केल्या. (maharashtra cm uddhav thackeray held a meeting on maratha reservation issue)

मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली. या बैठकीला मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील तसंच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुख्य सचिव संजय कुमार, विधि विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.

हेही वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार- अशोक चव्हाण

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. आरक्षणाच्या विरोधकांनी वारंवार अंतरिम स्थगिती मागितली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला. सोबतच २७ जुलै पासून न्यायालयात मराठा आरक्षणावर दररोज अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीमध्ये शासनाची बाजू अशीच भक्कमपणे मांडण्यासंदर्भात या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या.

महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. परंतु मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा- Maratha Reservation: मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीबाबत सरकार सकारात्मक- अशोक चव्हाण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा