Advertisement

महाराष्ट्रात लाॅकडाऊन-नाॅकडाऊन दोन्ही नकोत- उद्धव ठाकरे

आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, आणि कामगारांचं लसीकरण करून घेणं, पाळ्यांमध्ये काम करणं, घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) प्रोत्साहन देणं या गोष्टी कराव्या लागणार आहेत.

महाराष्ट्रात लाॅकडाऊन-नाॅकडाऊन दोन्ही नकोत- उद्धव ठाकरे
SHARES

आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरु करावेत, कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने (maharashtra) उद्योग चालवून दाखविले, असं उदाहरण मला देशात निर्माण करायचं आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी व्यक्त केलं. राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत ज्या पद्धतीने कोरोना साथीची परिस्थिती हाताळली गेली त्याची जगात प्रशंसा होत आहे. अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. दीड वर्षात कोरोना परिस्थितीला हाताळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्याच दरम्यान कोरोना विषाणूचं स्वरूप बदलल्याने अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

निकषानुसार अनलाॅक

अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत. त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेलं नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे, किंवा कडक याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेतील. युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावं लागलं, नाहीतर कोरोनाने (coronavirus) आपल्याला नॉकडाऊन केलं असतं, अशा मोजक्या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या गांभीर्याबद्दल सांगितलं. 

हेही वाचा- बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेनं धावणार

वर्क फ्राॅम होमला प्रोत्साहन

आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, आणि कामगारांचं लसीकरण करून घेणं, पाळ्यांमध्ये काम करणं, घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) प्रोत्साहन देणं या गोष्टी कराव्या लागणार आहेत. या शिवाय ज्या लोकांना कामावर येणं आवश्यक आहे, त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करण्यात यावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसंच उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात. वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

छोट्या, मध्यम उद्योजकांसाठी 

कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी लघू व मध्यम उद्योगांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुविधा देण्यात येतील, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी सांगितलं.

मोठे उद्योग समूह आपल्या कामगारांसाठी उपहारगृहाची सोय देऊ शकतात. मात्र छोट्या उद्योजकांकडे कामासाठी येणारे १५-२० हमाल आणि इतर कामगार येतात. अशांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५३ उपहारगृह चालविण्यात येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणीसाठी शासनातर्फे जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.

हेही वाचा- महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉक, ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा