Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

मुख्यमंत्र्यांकडून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले यांचं कौतुक

ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकणारे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षक रणजितसिंह डिसले यांचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून कौतुक केलं.

मुख्यमंत्र्यांकडून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले यांचं कौतुक
SHARES

युनेस्को आणि लंडन इथल्या वार्की फाऊंडेशनच्या वतीनं दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकणारे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षक रणजितसिंह डिसले यांचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दूरध्वनी करून कौतुक केलं.

शालेय शिक्षणात क्यू आर कोडचा वापर करून, दाखवलेल्या प्रयोगशिलतेबद्दल रणजितसिंह डिसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १४० देशांमधील १२ हजार शिक्षकांमधून डिसले यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना पुरस्कार म्हणून ७ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. 

पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्वत: डिसले यांना दूरध्वनी करून त्यांचं कौतुक केलं. पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसंच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचं रणजितसिंह डिसले यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महाराष्ट्राला (maharashtra) तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसंच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे, असंही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले.

डिसले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील डिसले यांचं अभिनंद केलं आहे. शालेय शिक्षणासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाची अभिनव वापर करणाऱ्या डिसले यांचं काम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

तर, रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला पुरस्कार ग्रामीण भागातील शिक्षकांचा गौरव वाढवणारा तसंच ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला बळ देणारा ठरेल. डिसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

पुरस्कार स्वरूपात मिळणारी ७ कोटी रुपयांची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच  ‘टीचर इनोव्हेशन फंड’साठी वापरण्याचा त्यांचा निर्धार त्यांचे वेगळेपण सिद्ध करणारा आहे. भारताला गुरुशिष्य परंपरेचा गौरवशाली इतिहास आहे. रणजितसिंह डिसले यांनी ही परंपरा केवळ पुढे नेली नाही तर, या परंपरेचा गौरव वाढवण्याचं काम केलं आहे. त्यांना जाहीर झालेला ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ राज्यातील आणि देशातील शैक्षणिक चळवळीला नवीन  दिशा व गती देईल, असा मला विश्वास वाटतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील डिसले यांचं कौतुक केलं आहे.

(maharashtra cm uddhav thackeray praise global teacher award winner ranjit singh disle)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा