Advertisement

म्हणून वाझेंना अडकवताय का? उद्धव ठाकरेंचा विरोधकांना सवाल

डेलकर असो किंवा हिरेन प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार. कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून वाझेंना अडकवताय का? उद्धव ठाकरेंचा विरोधकांना सवाल
SHARES

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. परंतु, सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन असल्याचं जे चित्र तयार केलं जात आहे ते योग्य नाही. सर्व प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होईल आणि कुणी दोषी आढळला तरी दयामाया न दाखवता कारवाई होईल. मात्र, आधी फाशी, मग चौकशी अशी नवीन न्यायाची पद्धत सुरू करायची आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजपला उद्देशून केला. 

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी समाप्त झालं. त्यानंतर विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपचा समाचार घेतला.

कोणत्याही मृत्यू प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणं हे सरकारचं काम आहे. काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्येआधी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. त्याचाही तपास सुरू आहे. परंतु, एखाद्याला लक्ष्य करून त्याला आयुष्यातून उठवायचं, अशी पद्धत सध्या सुरू आहे. डेलकर असो किंवा हिरेन प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार. कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- उद्धव ठाकरे सरकार न्याय देईल म्हणूनच मुंबईत आत्महत्या

प्रत्येक गोष्टीसाठी एक यंत्रणा असते. एखादा गुन्हा किंवा घटना किंवा दुर्घटना घडली असेल, त्याबाबत शंका असेल, तर आपल्याकडे अनेक तपास यंत्रणा आहेत. यांच्या यंत्रणा भारी असतील, तर पोलीस यंत्रणा रद्द करायची का?, असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

डेलकर प्रकरणातील संबंधित लोक हे भाजपचे (bjp) मंत्री होते, तसा सचिन वाझे काही आमचा मंत्री नव्हता. वाझे २००८मध्ये सेनेत होते. त्यांनी पुन्हा सदस्यत्व घेतलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी काहीही थेट संबंध नाही. राज्य सरकारकडे जसं तारतम्य आहे, तसं विरोधकांनीही बाळगलं पाहिजे. अर्णव गोस्वामींना अटक केली म्हणून केवळ वाझेंना अडकवताय का? असा प्रश्नही भाजपला उद्देशून मुख्यमंत्र्यांनी विचारला.

(maharashtra cm uddhav thackeray reacts on police officer sachin vaze issue)

हेही वाचा- कोरोनाचा पाॅझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह दिला, एकाला अटक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा