एकत्रित निवडणूकांसाठी मुख्यमंत्री राज्यमंत्रीमंडळ बरखस्त करतील : अशोक चव्हाण

एकत्रित निवडणूकांसाठी मुख्यमंत्री केव्हाही राज्यमंत्रीमंडळ बरखास्त करू शकतात, त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणूकीच्या कामाला लागण्याचे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली हे वाचा...

SHARE

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद इथल्या सभेत व्यक्त केली आहे. मात्र अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेष्टा केलीय.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण 

अशोक चव्हाण यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नये. राज्यमंत्रीमंडळ कुठल्या परिस्थितीत बरखास्त करणार नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसंच येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका या ठरवण्यात आलेल्या तारखेवरच होणार असल्याचंही स्पष्ट केलं.


चव्हाणाचं आवाहन

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार की नाही हे येत्या काळात कळेलच. पण अशोक चव्हाण यांनी त्याच दृष्टीकोनातून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचं आवाहन केलं आहे. चव्हाणांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधत, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केव्हाही राज्यमंत्री मंडळ बरखास्त करू शकतात. ज्यामुळे  लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्रित व्हाव्यात", असं चव्हाण यांनी जाहिर सभेत सांगितलं होतं.

महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ हा नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. तर लोकसभा निवडणूका या एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान होणार आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकित्रत निवडणूका घेण्यावरून अनेकदा मत व्यक्त केलं होतं. हेही वाचा

युतीसाठी 'नाणार' प्रश्न महत्वाचा


संबंधित विषय
ताज्या बातम्या