Advertisement

भाजप महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करतंय, नाना पटोलेंचा आरोप

भाजप विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही. भाजप (bjp) महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करत असून काँग्रेस हे कधीच सहन करणार नाही.

भाजप महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करतंय, नाना पटोलेंचा आरोप
SHARES

भाजप विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही. भाजप (bjp) महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करत असून काँग्रेस हे कधीच सहन करणार नाही. तसंच सचिन वाझे प्रकरणाच्या आडून मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 

मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलातना नाना पटोले यांनी भाजपच्या रणनितीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, सचिन वाझे प्रकरणानंतर गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळातील बदलाबाबत चर्चा झालेली नाही. ज्यावेळेस ती होईल, तेव्हा आपल्याला कळेलच. तसंच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याकडे असतो. त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तपदी कुणाला ठेवायचं आणि कुणाला नाही, त्यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम की..?, मनसेचा खोचक सवाल

खरं तर ज्या पद्धतीने मुंबई पोलीस (mumbai police) आणि महाराष्ट्र पोलिसांना टार्गेट केलं जातंय, त्याकडे पाहता भाजप जाणीवपूर्वक पोलीस दलाला खलनायक ठरवण्याचं काम करत आहे. मुंबई पोलिसांचं कौतुक संपूर्ण जगामध्ये केलं जातं. तरीही ज्या ठिकाणी भाजपविरोधी सरकार आहे, त्या ठिकाणी एनआयए आणि ईडीचा वापर केला जातो. हा आमच्यासाठी नवीन विषय राहिलेला नाही आणि संपूर्ण देशाने हे पाहिलेलं आहे. महाराष्ट्र पोलिसांचा अपमान काँग्रेस कधीच सहन करणार नाही.

सचिन वाझे प्रकरणाच्या आडून खासदार मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. एनआयए एवढीच सक्षम यंत्रणा असेल तर पुलवामा घटेनाचा रिपोर्ट एनआयएकडून आतापर्यंत का आलेला नाही? हे केंद्राने स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळे ज्याला कर नाही तर त्याला डर कशाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सचिन वाझे असो किंवा कुणी असो कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला.

(maharashtra congress president nana patole allegations bjp over defamation of maharashtra police)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा