Advertisement

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या वक्तव्यावर नाना पटोले यांचा खुलासा

फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या वक्तव्यावर नाना पटोले यांचा खुलासा
SHARES

स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार, असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर खुलासा केला.

नाना पटोले यांनी लोणावळा इथं झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आपल्यावर पाळत ठेवून आहेत. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा खळबळजनक दावा केला.  

सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे.

हेही वाचा- तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

महाराष्ट्रात काँग्रेस (congress) उभी होत असल्याचं त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप केला होता.

त्यावर एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना, तुम्हाला मिळालेल्या क्लिपचा अर्थ तसा नाही, माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी हे बोललो खरं आहे की, पक्ष वाढीसाठी मी स्वबळाचा नारा दिला होता. मी बोललो तर चूक आणि इतरांनी हे वक्तव्य केलं तर ते योग्य? हे माझं वक्तव्य आहे." तसेच पुढे बोलताना म्हणाले की, "पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप नाही. मी मुंबईत आल्यावर याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया देईन, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 

(maharashtra congress president nana patole clarifies on phone tapping allegations )

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा