Advertisement

काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा इरादा पक्का, नाना पटोले यांची ठाम भूमिका

आम्हाला वेगळं ठेवल्याने त्यांचा काही फायदा होणार नाही, उलट आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यात त्यांचा फायदाच आहे, नुकसान तर काहीच नाही

काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा इरादा पक्का, नाना पटोले यांची ठाम भूमिका
SHARES

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात (maharashtra) महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असून हे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल. मात्र येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल हा आमचा इरादा देखील पक्का आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात राज्यातील पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असावा, अशी प्रबळ भावना असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना आम्ही आमचं समर्थन दिलेलं आहे. हे सरकार ५ वर्षे राज्यात टिकेल. आमच्या दृष्टीने मुख्य मुद्दा हा आहे की पक्षाची ताकद आजमवण्यासाठी आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ असा नाही की सरकारला काही धोका आहे. हे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. त्याला आमचं पूर्ण समर्थन राहील.

हेही वाचा- कोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आहे की राज्याचा पुढील मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच (congress) असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात उल्लेख केलेला शेतकरी हा सुरूवातीला जरी मोदीभक्त असला तरी, नंतरहून मोदी हे जुमलेबाज असून त्यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे समस्त शेतकऱ्यांच्या मनात राज्यातील पुढचा मुख्यमंत्री हा शेतकरी कुटुंबातील असावा, अशी इच्छा आहे.

हे सरकार आमच्या भरवशावर आहे, आम्ही सरकारच्या भरवशावर नाही, असं वक्तव्य मी याआधी केलं होतं. त्यावर नंतर आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाही झाली. आम्हाला वेगळं ठेवल्याने त्यांचा काही फायदा होणार नाही, उलट आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यात त्यांचा फायदाच आहे, नुकसान तर काहीच नाही, असं नाना पटोले म्हणाले. 

महाराष्ट्र असं एक राज्य आहे, जिथं काँग्रेसला मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे. या वर्गाला असं वाटतं की काँग्रेस स्वबळावर राज्यात सत्तेत यावं. कार्यकर्त्यांच्या मनात देखील हीच इच्छा आहे. म्हणूनच येऊ घातलेल्या निवडणुका मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत किंवा विधानसभा निवडणुका काँग्रेसने त्या स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

(maharashtra congress president nana patole comment on maha vikas aghadi government stability)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा