Advertisement

पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही फडणवीसांना घरचा आहेर- सचिन सावंत

एका बाजूला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोरोनाविरूद्धच्या लढ्याबाबत कौतुक करत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत.

पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही फडणवीसांना घरचा आहेर- सचिन सावंत
SHARES

एका बाजूला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोरोनाविरूद्धच्या लढ्याबाबत कौतुक करत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र राज्य सरकारवर या ना त्या कारणाने टीका करताना  दिसत आहेत, त्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे.

फडणवीस साहेबांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांच्याकडूनही अगदी घरचा मोठा आहेर मिळाला आहे! महत्वाचं म्हणजे हा आहेर आभासी नाही, खराखुरा आहे! असं म्हणत सचिन सावंत यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.

सध्या मुंबईच्या कोरोनाविरोधातील लढ्याचं सर्वोच्च न्यायालयासह देशपातळीवर कौतुक होत आहे. 

हेही वाचा- 'मुंबई पालिकेनं करून दाखवलं, जरा त्यांच्याकडून शिका!' सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

दरम्यान, दिल्लीतील आॅक्सिजनसंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी मुंबई महापालिकेनं चांगलं काम केलं आहे, त्यांच्या मॉडेलकडे पाहा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अधिकाऱ्यांना दिला होता. कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पालिका चांगलं काम करत असून त्यांच्या माॅडेलचा अभ्यास करण्याची सूचनाही दिल्ली प्रशासनाला न्यायालयाने दिली होती.

त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून मुंबईतील स्थिती उत्तरीत्या हाताळल्याबद्दल कौतुक केलं होतं. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका प्रशासन मुंबईत कमी चाचण्या घेत असल्यानेच कमी रुग्णसंख्या दिसून येत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला.

मात्र नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पुन्हा एकदा मुंबई महापालिका प्रशासन आणि महापालिका आयुक्तांचं कौतुक केल्यामुळे फडणवीसांना घरचा आहेर मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

(maharashtra congress spokesperson sachin sawant criticized devendra fadnavis on mumbai covid 19 situation)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा