Advertisement

Ajit Pawar: ‘राजगृह’ तोडफोडीची शासनाकडून गंभीर दखल- अजित पवार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह आहे, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar: ‘राजगृह’ तोडफोडीची शासनाकडून गंभीर दखल- अजित पवार
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. राज्य शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

या घटनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या वाईट हेतूला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा - Uddhav Thackeray: राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही- उद्धव ठाकरे

तत्पूर्वी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह निवासस्थान महाराष्ट्रातील तमाम जनतेचं तीर्थक्षेत्रच आहे. त्यामुळे राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह निवासस्थान महाराष्ट्रातील तमाम जनतेचं तीर्थक्षेत्रच आहे. त्यामुळे राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. पोलिसांना दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. 

ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचं श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील दादर, हिंदू कॉलनी इथं राजगृह निवासस्थान आहे. या निवासस्थानावर मंगळवारी उशीरा रात्री काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ अज्ञात व्यक्ती इमारतीच्या आवारात शिरल्याचं दिसत आहे. इमारतीच्या आवारात शिरल्यावर घराबाहेरील कुंड्यांची आणि घरांच्या काचांची तोडफोड त्यांनी केली. एवढंच नाही तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा