Advertisement

म्हाडा बाबतच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका- अजित पवार

‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

म्हाडा बाबतच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका- अजित पवार
SHARES

‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. तसंच ‘म्हाडा’च्या योजनेत घर मिळवून देणाऱ्या दलालाविरुद्ध संबंधित विभागाचे मंत्री, पोलीस विभाग, म्हाडा कार्यालय यांच्याकडे तक्रार करा, असंही त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील विविध योजनेतील एकूण ५ हजार ६४७ सदनिकांच्या सोडतीचा संगणकीय ऑनलाईन उद्घाटन समारंभ नेहरु मेमोरियल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, उपमहापौर सरस्वती शेंडगे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- आता नारायण राणेंना सुखाने झोप लागेल, शरद पवारांचा टोला

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) म्हणाले, शहरात स्वत:च्या हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु वाढलेली महागाई, घरांच्या वाढलेल्या किंमती यामुळे घर घेण्यासाठी त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र ‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्काची घरं मिळवून देण्याचं काम सुरु आहे. ‘म्हाडा’च्या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना दर्जेदार आणि माफक किंमतीत घरं उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरिकांनी ‘म्हाडा’च्या योजनांवर दाखविलेला विश्वास कौतुकास्पद आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

‘म्हाडा’च्या माध्यमातून घरे बांधतांना घरात हवा खेळती राहील तसंच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, क्रीडांगणासाठी आरक्षित जागा ठेवावी, झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश देत ‘झाडे लावूया, वनांचे संरक्षण करुया’ असा संदेशही अजित पवार यांनी दिला.

(maharashtra deputy cm ajit pawar praised mhada housing lottery)

हेही वाचा- सीरममधील लस सुरक्षित, आगीच्या घटनेची चौकशी करणार- उद्धव ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा