Advertisement

विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय- वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच शिक्षण विभागाने नियमावली जारी केली असून ती सर्व शाळांना काटेकोरपणे पाळावी लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय- वर्षा गायकवाड
SHARES

कोरोनाच्या परिस्थितीत शाळा सुरू करणं आव्हानात्मक असलं, तरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊनच महाराष्ट्रात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच शिक्षण विभागाने नियमावली जारी केली असून ती सर्व शाळांना काटेकोरपणे पाळावी लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

केंद्र आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचं पालन करूनच २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील. तसंच जारी केलेल्या नियमावली (एसओपी)नुसारच शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होईल. स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवस आड करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येईल. त्यात ४० मिनिटांचे ४ तास याचनुसार वर्ग घेण्यात येतील. शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना शिक्षण विभागाने या पूर्वीच जाहीर केल्या आहेत. या सूचनांचं पालन होतं की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचा- ९ वी ते १२ वी वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू, 'अशा' आहेत मार्गदर्शक सूचना

खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसंच खेळत्या हवेच्या वर्गात शिकवणी घेण्याची मुभा शाळा व्यवस्थापनास देण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येईल. सर्वसाधारणपणे या वर्षी परीक्षा उशिरा घेण्यात येतील, असा अंदाज आहे. विदर्भातील ऊन, कोकणातील पाऊस व इतर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतील, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. 

शाळा सुरू करण्याआधी जिल्हा प्रशासन व महापालिकेद्वारा शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. तसंच कुटुंबातील सदस्य आजारी असलेल्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्याची तब्येत ठिक नसल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अशा विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

(maharashtra education minister varsha gaikwad talks on school reopening)

हेही वाचा- दिवाळीनंतर शाळा होणार सुरू , उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा