Advertisement

९ वी ते १२ वी वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू, 'अशा' आहेत मार्गदर्शक सूचना

दिवाळीनंतर राज्यात ९ वी ते १२ वी वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करताना काय काळजी घ्यावी यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

९ वी ते १२ वी वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू, 'अशा' आहेत मार्गदर्शक सूचना
SHARES

दिवाळीनंतर राज्यात ९ वी ते १२ वी वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करताना काय काळजी घ्यावी यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार, एका दिवशी पन्नास टक्केच विद्यार्थी उपस्थित राहणार असून तीन ते चार तासच शाळा भरणार आहे. विद्यार्थ्यांना उपस्थित राहणं बंधनकारक नाही.

मार्गदर्शक सूचनांनुसार, पालकांच्या संमतीनेच शाळेत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. एका दिवशी वर्गातील पन्नास टक्केच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बोलावण्यात येईल. उरलेले पन्नास टक्के विद्यार्थी घरी बसून ऑनलाइन अभ्यास करतील. इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय शाळेत शिकवले जातील. इतर विषय ऑनलाइन शिकवण्यात येतील. एका बाकावर एकाच विद्यार्थ्यांला बसवण्यात येईल. शाळेचा कालावधी जास्तीतजास्त तीन ते चार तासांचा असेल. दोन तासांमध्ये दहा मिनिटांचे अंतर असेल.

शाळेच्या आवारात एका वेळी चारपेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत याची मुख्याध्यापकांनी खबरदारी घ्यायची आहे. परिपाठ, स्नेहसंमेलन, खेळ या विद्यार्थ्यांना एकत्र आणणाऱ्या उपक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे मधली सुट्टीही होणार नाही. शाळेत डबे खाण्यासाठी परवानगी नसेल. शाळेच्या बाहेर वाहनांची गर्दी होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. गर्दी टाळण्यासाठी सगळे विद्यार्थी आणि कर्मचारी, शिक्षकांसाठी शाळेत येण्याच्या आणि जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतील.

आरोग्यसेतू वापरण्याची सूचना द्यावी असे केंद्राच्या सर्व परिपत्रकांमध्ये नमूद करण्यात आले आहे. आता पालक, शिक्षकांना आरोग्यसेतू घ्यावे लागेल. आरोग्याची स्थिती, आरोग्यसेतू अ‍ॅपवरील तपासणी अहवाल, प्रवासाची माहिती याबाबत पालक, शिक्षकांनी घोषणापत्र द्यायचे आहे.

अनेक गावांतील शाळा, महाविद्यालयांमध्ये अजूनही अलगीकरण कक्ष आहेत. स्थानिक प्रशासनाने हे कक्ष स्थलांतरित करावेत अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी कक्ष स्थलांतरित करणे शक्य नसेल, अशा ठिकाणी शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवण्यात यावी.

 शिक्षकांना करोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शिक्षकांनी १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान चाचणी करून घेणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने चाचणी करावी.हेही वाचा-

कोव्हॅक्सीन' लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सायन रुग्णालयात होणार

मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे- मुंबई पोलिसRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा