Advertisement

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत रद्द

राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशातील ७०:३० कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असून यापुढे ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ या नुसार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत रद्द
SHARES

राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशातील ७०:३० कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असून यापुढे ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ या नुसार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली. आतापर्यंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ७० टक्के प्रादेशिक कोटा आणि ३० टक्के राज्यस्तर कोटा यानुसार राबवण्यात येत होती. हा कोटा रद्द झाल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश होतील. गुणवत्तेच्या आधारे राज्यातील कोणत्याही भागांतील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. (maharashtra government cancels reservation quota system in medical college admission)

जुन्या पद्धतीत उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे ३ प्रादेशिक विभाग करण्यात आलेले होते. ज्या प्रादेशिक विभागातून उमेदवार १२ वी उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्यांच्या संबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयामध्ये ७० टक्के जागा राखीव असायच्या. तसंच ३० टक्के जागा या संपूर्ण राज्यातील उमेदवारांकरिता उपलब्ध असायच्या. तिन्ही प्रादेशिक विभागामध्ये महाविद्यालयांची संख्या आणि पर्यायाने प्रवेशासाठी उपलब्ध जागांची संख्या भिन्न होत्या.

हेही वाचा - वैद्यकीयच्या परीक्षांना स्थगिती नाहीच, हायकोर्टाने पुन्हा फेटाळली 'त्या' विद्यार्थ्यांची याचिका

त्यामुळे मराठवाड्यासारख्या प्रादेशिक विभागामध्ये जिथं महाविद्यालयांची संख्या कमी आहे, तेथील विद्यार्थ्यांना ७० टक्के प्रादेशिक जागांमध्ये कमी जागा उपलब्ध व्हायच्या. त्यामुळे उच्च गुणवत्ता असूनही तेथील उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. तर काही विद्यार्थ्यांना प्रवेशास मुकावं लागत होतं. त्यामुळे ७०:३० कोटा पद्धत ही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने मराठवाड्यातील पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून तसंच लोकप्रतिनिधींकडून ही कार्यपद्धती रद्द करण्याची वारंवार मागणी होत होती, असं अमित देशमुख म्हणाले.

आतापर्यंत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता नीट (NEET) या राष्ट्रीय स्तरावरील एकाच सामाईक प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत होता. तसंच त्याबाबतची प्रवेशप्रक्रिया ही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांचेमार्फत राबविण्यात येत होती. ७०:३० कोटा पद्धतीमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याने ही कार्यपद्धती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमामध्ये बदल करण्याकरिता ४ सप्टेंबर, २०२० रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.

हेही वाचा - कोरोना संकटात झाली इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा