Advertisement

मुंबै बँकेला राज्य सरकारची क्लिनचिट


मुंबै बँकेला राज्य सरकारची क्लिनचिट
SHARES

मुंबै बँकेच्या चांदिवली येथील २ शाखांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दाखला देत काँग्रेस आमदार नसीम खान यांनी या बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मांडला. याला उत्तर देताना राज्यमंत्री सुभाष देशमुख यांनी या बँकेने नातेवाईकांना कर्ज न दिल्याचं तपासात आढळल्याची माहिती देत संचालकांना एकप्रकारे क्लिनचिटच दिली आहे.


अहवाल येण्याआधीच क्लिनचिट 

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 'दक्षता' समितीचा अहवाल येण्याआधी मंत्र्यानी सभागृहात माहिती दिल्यानं मुंबै बँकेचे संचालक प्रवीण दरेकर यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातेदारांच्या नावावर परस्पर कर्ज काढून पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दक्षता पथकाच्या चौकशीत समोर आल्याचं खरं आहे का? असा प्रश्न नसीम खान यांनी सभागृहात विचारला. याला उत्तर देताना 'चौकशी झाली असली तरी बँकेने गैरव्यवहार केल्याचं निदर्शनात आलेलं नाही', अशी माहिती सुभाष देशमुख यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे मुंबै बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचं प्रशस्तीपत्रकच मंत्रीमहोदयांनी दिलं.


काय म्हणाले देशमुख?

नातेवाईकांना कर्ज दिल्याचं चौकशीत आढळून आलेलं नाही. तरीही याप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा