Advertisement

सरकारची विरोधी पक्षावर हेरगिरी? विखे पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रांचचे अधिकारी

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेत एक पोलीस अधिकारी आणि काॅन्स्टेबल यांना पत्रकारांनी हेरगिरी करताना रंगेहाथ पकडलं. सरकार किती खालच्या थराला गेलं असल्याची प्रचिती यातून येत आहे. हा प्रकार म्हणजे आमच्या ह्क्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारची विरोधी पक्षावर हेरगिरी? विखे पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रांचचे अधिकारी
SHARES

चोर आणि संशयीत व्यक्तींवर पोलीस हेरगिरी करतात हे अापण अनेकदा ऐकलं वा वाचलं असेल, पण गुरूवारी चक्क विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत पोलीस हेरगिरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेत एक पोलीस अधिकारी आणि काॅन्स्टेबल यांना पत्रकारांनी हेरगिरी करताना रंगेहाथ पकडलं. सरकार किती खालच्या थराला गेलं असल्याची प्रचिती यातून येत आहे. हा प्रकार म्हणजे आमच्या ह्क्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


नेमकं काय झालं?

राधाकृष्ण विखे पाटील गुरूवारी सायंकाळी आपल्या बंगल्यात पत्रकार परिषद घेत असताना दोन अज्ञात इसमांवर त्यांची नजर गेली. त्यांची विचारणा केली असता ते एसबी (स्पेशल ब्रांच)चे अधिकारी असल्याचं उघड झाल. त्यापैकी एकजण एपीआय सुभाष सामंत तर दुसरे पोलिस काॅन्स्टेबल बाजीराव सरगर होते. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच गोंधळ उडाला. इतर पत्रकारांप्रमाणे हे दोघेही विखे पाटील काय म्हणताहेत ते लिहून घेत होते. एवढंच नव्हे, तर उपस्थित पत्रकारांचे फोटो देखील काढून घेत होते. एखाद्याच्या निवासस्थानी विनापरवानगी येणं आणि वक्तव्य टिपून घेणं ही हेरगिरी असून हा प्रकार गंभीर असल्याचं विखे पाटील म्हणाले.


मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

या संदर्भात आपण पोलीस आयुक्तांशी संपर्क केला असून याप्रकरणी संबंधितांवर आपण त्वरीत कारवाई करू, असं आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून अशा प्रकारची हेरगिरी कारणं म्हणजे आमच्या ह्क्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा