Advertisement

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी
SHARES

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतले असल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले.

नवाब मलिक यांची चौकशी ज्यासाठी ईडीनं सुरु केलीय ते प्रकरण दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी संबंधित असल्याची माहिती मिळते.

गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीनं याआधीच ताब्यात घेतलं आहे. या चौकशीत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागली. नवाब मलिक यांच्या भावाला मंगळवारी ईडीने समन्स पाठवलं होतं.

त्यानंतर बुधवारी पहाटे नवाब मलिक यांच्या कुर्ला या निवासस्थानी ईडीचे अधिकारी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान पोहचले. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात स्वत: हून येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी अधिकाऱ्यांसोबत घरातून निघाले.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा