Advertisement

"कुटुंबाला वेळ देण्यासाठी पोलिसांना द्या भरपगारी रजा"

कोरोना वाॅरियर्सना दुप्पट बोनस आणि कोरोनानंतर भारपगारी सुट्टी द्यावी जेणेकरून ते आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकतील, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

"कुटुंबाला वेळ देण्यासाठी पोलिसांना द्या भरपगारी रजा"
SHARES

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेला मोठं कोरोना पॅकेज देऊ, असं वचन दिलं होतं, ते केव्हा देणार? का तोही खोटा लॉलीपॉप होता? डाॅक्टर आणि पोलीस अशा कोरोना वाॅरियर्सना दुप्पट बोनस आणि कोरोनानंतर भारपगारी सुट्टी द्यावी जेणेकरून ते आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकतील, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.  

कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊन काळात पोलीस कर्मचारी, डाॅक्टर-नर्स असे कोरोना वाॅरियर्स रात्रंदिवस एक करत कर्तव्य बजावत आहेत. या कोरोना वाॅरियर्सना आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, असं म्हणत राम कदम यांनी ही मागणी केली आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, मागील ७ महिन्यांच्या कालखंडात महाराष्ट्रातील सर्व पोलीस बांधव तसंच आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर-नर्सेस, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी-अधिकारी यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली.

हे सर्व कोरोनायोद्धे आहेत. त्यांच्या त्यागाचे आणि सेवेचे मोल खूप मोठे आहे. त्यातच आपण कोरोना काळात पोलिसांचा पगारही कापलात. तेही त्यांनी नम्रपणे सहन केलं. अनेकांनी सेवा करता करता आपले प्राण गमावले.

आपण बांधिलकीच्या भावनेतून सर्व कोरोनायोद्ध्यांना दिवाळीत दुप्पट बोनस द्यावा. तसंच कोरोना संकट गेल्यावर आळीपाळीने वाढीव भरपगारी रजा द्यावी. जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ देता येईल. कोरोना संकटसमयी त्यांनी लक्षणीय वेळ समाजासाठी दिला आहे. हे नाकारता येणार नाही. 

सरकार म्हणून आपण कोरोना काळात महाराष्ट्राच्या जनतेला अजूनही एक पैशाची मदत केलेली नाही. मोठं पॅकेज देईन, असं आपलं आश्वासन होतं. तेही दिवाळीत आपण पूर्ण करावं, असं राम कदम यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.    

(maharashtra government must give double bonus and paid leave to police personnel demands bjp mla ram kadam)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा