Advertisement

मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का लावा- आशिष शेलार

वांद्रे इथं तोंडाला लावायच्या मास्कचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफार्श केला. अशा प्रकारे मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार (bjp mla ashish shelar) यांनी मंगळवारी केली.

मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का लावा- आशिष शेलार
SHARES

वांद्रे इथं तोंडाला लावायच्या मास्कचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफार्श केला. अशा प्रकारे मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार (bjp mla ashish shelar) यांनी मंगळवारी केली.

अशी केली कारवाई

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गामुळे आधीच मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी मास्कचा तुटवडा भासत असताना काहीजण अवैधरित्या मास्कचा साठा वांद्रे परिसरात घेऊन येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ९ (mumbai police crime branch) ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ३ ट्रक पकडले. या ट्रकमध्ये १५ ते २० काेटी रुपये किंमतीचे तब्बल २५ लाख मास्क बाॅक्समध्ये भरून ठेवले हाेते. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती निश्चित केल्या आहेत. तरीही या मास्कचा साठा करून २ रुपये किंमतीचं मास्क १० रुपयांना आणि १०० रुपये किंमतीचं मास्क ४०० रुपयांना विकून नफा करण्याचा या साठेबाजांचा इरादा होता. पोलीस या प्रकरणाचा मागोवा घेत आहे.

हेही वाचा- Corona Virus : मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश, गुन्हे शाखा ९ ची मोठी कारवाई

काही दिवसांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनाने (fda) नाहूरमधून तब्बल १ कोटी रुपयांच्या सॅनिटायझरचा (sanitizer) साठा जप्त केला होता. मुंबईतून परदेशात पाठवण्यासाठी हे हँड सॅनिटायझर बनवण्यात येत होतं. .

या कामगिरीबद्दल पथकाचं नेतृत्व करणारे वांद्रे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई आणि त्यांच्या पथकाचं आमदार आशिष शेलार यांनी कौतुक केलं. शिवाय या प्रकारणी दोषी असणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा