Advertisement

कल्याण, भिवंडी मेट्रोचा मार्ग बदलणार, नव्याने होणार सर्वेक्षण

कल्याण-भिवंडी (Kalyan bhiwandi metro) आणि कल्याण-तळोजा (kalyan taloja metro) या दोन्ही प्रस्तावित मेट्रो मार्गांचं आरेखन बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण (survey) करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी एमएमआरडीएला दिले.

कल्याण, भिवंडी मेट्रोचा मार्ग बदलणार, नव्याने होणार सर्वेक्षण
SHARES

कल्याण-भिवंडी (Kalyan bhiwandi metro) आणि कल्याण-तळोजा (kalyan taloja metro) या दोन्ही प्रस्तावित मेट्रो मार्गांचं आरेखन बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण (survey) करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (mmrda) बैठकीत दिले आहेत. या दोन्ही मार्गाच्या कामात मोठय़ा प्रमाणात बांधकामे विस्थापित होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत.  

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (mmrda) माध्यमातून ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही शहरांना जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यानुसार भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गात धामणकर नाका उड्डाणपूल (dhamankar naka flyover) अडथळा ठरत नसल्याने हा पूल पाडावा लागणार आहे. तसं झाल्यास शहरात मोठी वाहतूककोंडी होऊन वाहतुकीचा सर्व भार मुंबई-नाशिक महामार्गावर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- मेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा

एवढंच नाही, तर धामणकर नाका (dhamankar naka) परिसरात सरकारी रुग्णालय, भिवंडी न्यायालय, भिवंडी महापालिका, एसटी बस थांबा यासह अनेक महत्त्वाची खासगी कार्यालये असल्याने या बांधकामांनाही धक्का पोहचण्याची शक्यता आहे.   

तसंच या प्रकल्पासाठी सध्या बांधकाम सुरू असलेल्या नव्या इमारतीही पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे भिवंडी-कल्याण नियोजित मेट्रो प्रकल्पाच्या आरेखनाविषयी या भागातील विकासकांनीही हरकती नोंदवल्या आहेत. 

कल्याण-तळोजा (kalyan taloja metro) या मेट्रो मार्गाबाबतही अशीच काहीशी स्थिती आहे. या मार्गावरही काही बांधकामे बाधित होतील, असं म्हटलं जात आहे. शिवाय कल्याणच्या पश्चिम भागातून जाणारी मार्गिका दुर्गाडी येथून थेट एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला कॉलेज (birla college) परिसर मार्गे नेली तर कल्याण पश्चिमेचा बराचसा भाग मेट्रो मार्गाने जोडला जाईल. त्यामुळे येथील मार्गिकेतही बदल करण्याची मागणी होत आहे. 

 हेही वाचा- मेट्रो-३ प्रकल्पातील 'इतक्या' स्थानकांचं खोदकाम १०० टक्के पूर्ण

या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दोन्ही मेट्रो मार्गाचे आरेखन बदलण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले.  या बैठकीला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant shinde), एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी आदी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा