Advertisement

शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक- नीलम गोऱ्हे

शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक- नीलम गोऱ्हे
SHARES

शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आझाद मैदानात विविध मागण्यासंदर्भात आंदोलन करीत असलेल्या शिक्षक-कर्मचारी संघाशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भाई गिरकर, आमदार अभिमन्यू पवार, डॉ. रणजीत पाटील, रामराव पाटील आदी उपस्थित होते.

आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शिक्षकांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सातत्याने सकारात्मक पावले उचलत असून शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येईल.

हेही वाचा- आंदोलनकर्त्या शिक्षकांना भेटायला मंत्र्यांकडे वेळ नाही- देवेंद्र फडणवीस 

दरम्यान गुरूवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र (devendra fadnavis) फडणवीस यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेऊन सरकारवर कडाडून टीका केली होती. एकिकडे शिक्षक तर दुसरीकडे मराठा तरूण आंदोलन करत आहेत. शिक्षकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास शाळा अनुदानासह इतर मागण्यांसाठी गेल्या ४० दिवसांपासून राज्यातील शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. पण, महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलनं झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज तर कुणीही भेटायला येत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. 

जो निर्णय आमच्या सरकारच्या काळात झाला आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद सुद्धा झाली, ती केवळ हे सरकार अंमलात आणत नाही, म्हणून शिक्षकांसारख्या घटकावर आंदोलनाची वेळ येणं आणि त्यांना इतके दिवस बसवून ठेवणे हे दुर्दैवी आहे. नुसत्या अंमलबजावणीला सव्वा वर्ष लागतो? 

खरं तर आतापर्यंत ६० टक्क्यांपर्यंतचं अनुदान व्हायला पाहिजे होतं आणि ४० टक्क्यांचा टप्पा देखील सरकारने जाणीवपूर्वक दिलेला नाही. मुंबईच्या बिल्डरांना ५ हजार कोटी रूपयांची सूट आणि शिक्षकांसाठी ३०० कोटी रुपये खर्च करायला सरकार तयार नाही, हे खेदजनक आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(maharashtra government positive to fulfill teachers demands says vidhan parishad deputy president neelam gorhe)

हेही वाचा- दादांच्या मनातलं ओळखणारी भाषा शिकायचीय- उद्धव ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा