Advertisement

आंदोलनकर्त्या शिक्षकांना भेटायला मंत्र्यांकडे वेळ नाही- देवेंद्र फडणवीस

मागील ४० दिवसांपासून आपल्या विविध मागण्यासाठी राज्यभरातील शिक्षक संघटना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. तरीही राज्य सरकारमधील मंत्री किंवा अधिकारी देखील त्यांना भेटायला येत नाही.

आंदोलनकर्त्या शिक्षकांना भेटायला मंत्र्यांकडे वेळ नाही- देवेंद्र फडणवीस
SHARES

मागील ४० दिवसांपासून आपल्या विविध मागण्यासाठी राज्यभरातील शिक्षक संघटना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. तरीही राज्य सरकारमधील मंत्री किंवा अधिकारी देखील त्यांना भेटायला येत नाही. सरकारच्या संवेदना बधीर झाल्याचं हे लक्षण असल्याचं वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची तसंच मराठा आंदोलकांची देखील गुरूवारी भेट घेतली यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, रणजित पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, एकिकडे शिक्षक तर दुसरीकडे मराठा तरूण आंदोलन करत आहेत. शिक्षकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास शाळा अनुदानासह इतर मागण्यांसाठी गेल्या ४० दिवसांपासून राज्यातील शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. पण, महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलनं झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज तर कुणीही भेटायला येत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. 

हेही वाचा- कोण म्हणतंय संजय राठोड बेपत्ता आहेत?- अजित पवार

मुळात जो निर्णय आमच्या सरकारच्या काळात झाला आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद सुद्धा झाली, ती केवळ हे सरकार अंमलात आणत नाही, म्हणून शिक्षकांसारख्या घटकावर आंदोलनाची वेळ येणं आणि त्यांना इतके दिवस बसवून ठेवणे हे दुर्दैवी आहे. नुसत्या अंमलबजावणीला सव्वा वर्ष लागतो? 

खरं तर आतापर्यंत ६० टक्क्यांपर्यंतचं अनुदान व्हायला पाहिजे होतं आणि ४० टक्क्यांचा टप्पा देखील सरकारने जाणीवपूर्वक दिलेला नाही. मुंबईच्या बिल्डरांना ५ हजार कोटी रूपयांची सूट आणि शिक्षकांसाठी ३०० कोटी रुपये खर्च करायला सरकार तयार नाही, हे खेदजनक आहे.

मराठा तरूणांच्या प्रश्नाच्या बाबतीत, एसईबीसीच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या. केवळ त्यांना रूजू करून घेतलं जात नाहीय. केवळ सरकारच्या अनिर्णयामुळे मराठा तरूणांचं स्वप्न धुळीस मिळत आहे. हे प्रश्न आम्ही लावून धरणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(devendra fadnavis meet protester teachers and maratha youth at azad maidan mumbai)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा