Advertisement

कोण म्हणतंय संजय राठोड बेपत्ता आहेत?- अजित पवार

माझं संजय राठोड यांच्याशी फोनवरून बोलणं झालं असून कोण म्हणतंय ते बेपत्ता आहेत? असा उलटा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

कोण म्हणतंय संजय राठोड बेपत्ता आहेत?- अजित पवार
SHARES

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गुंतल्याचे आरोप होत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) मागील ११ दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा सातत्याने भाजपकडून करण्यात येत आहे. परंतु माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं असून कोण म्हणतंय संजय राठोड बेपत्ता आहेत? असा उलटा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

संजय राठोड प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलं असता अजित पवार यांनी सांगितलं की, कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागू शकतो. यावर चर्चा करण्यासाठी माझं यशोमती ठाकूरं, संजय राठोड, बच्चू कडू यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. राज्याच्या प्रमुखांनी निर्णय घेतला तर त्यांना तो समजलाच पाहिजे. सहकारी असल्याने त्यांना विश्वासात घेणं, माहिती देणं महत्वाचं असतं, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- ...म्हणून संजय राठोड समोर येत नाहीत- संजय राऊत

अरुण राठोड यांच्या अटकेविषयी विचारला असता, याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू असून त्यातून सत्य बाहेर येईल. काहींना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. परंतु मी अद्याप पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. आम्ही त्यात कोणतीही मध्यस्थी करत नाही. मी काही कारण नसताना फोन करुन विचारलं तर त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचं बोललं जाईल, त्यामुळे पोलिसांना निर्भीडपणे चौकशी करण्यासाठी सांगितलेलं आहे, असं अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्ट केलं.

ज्या कुणा व्यक्तीवर कुठले आरोप होतात त्याची रितसर चौकशी झाली पाहिजे. चौकशी होऊन अंतिम अहवाल हाती येईपर्यंत संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. त्याआधीच कुणालाही आरोपी किंवा दोषी धरणं योग्य नाही. राहिला प्रश्न संजय राठोड यांचा तर चौकशीआधीच त्यांना दोषी धरून पदावरून हटवणं कितपत योग्य आहे? ही विचार करण्यासारखी बाब आहे. शिवाय ते शिवसेनेचे नेते असल्याने शिवसेनाच त्यांच्याबद्दल भूमिका घेईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.  

(sanjay rathod is not wanted says ajit pawar)

हेही वाचा- ‘ती’ आॅडियो क्लिप माझी नाही, राजेश टोपेंचा खुलासा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा