Advertisement

‘ती’ आॅडियो क्लिप माझी नाही, राजेश टोपेंचा खुलासा

आरोग्यमंत्र्यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं उघड झालं आहे. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

‘ती’ आॅडियो क्लिप माझी नाही, राजेश टोपेंचा खुलासा
SHARES

मागील काही दिवसांपासून मास्क न घालताच सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री सूचना देत असल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु ही ऑडिओ क्लिप आरोग्यमंत्र्यांची नसून ती बनावट असल्याचं उघड झालं आहे. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनाबाधित रुग्णांचं पूर्वीच्या तुलनेत घटलेलं प्रमाण, सरकारकडून शिथिल करण्यात आलेलं लाॅकडाऊन आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला झालेली सुरूवात यामुळे कोरोना विषाणू पूर्णपणे हद्दपार झाल्याच्या अविर्भावात नागरिक अत्यंत बेफिकीरीने वागू लागले आहेत. विना मास्क घराबाहेर पडण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दीत मिसळत आहेत. परिणामी कोरोना विषाणू (coronavirus) संसर्गही पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही हीच परिस्थिती आहे.

हेही वाचा- नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

युरोपात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आल्यावर तिथं पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्यात आलं. त्याचप्रमाणे नागरिकांना कोरोना संदर्भातील नियमांचं पालन न केल्यास बेफिकीरीने वागून कोरोना संसर्ग वाढण्यास हातभार लावल्यास लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय असेल, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला हाेता. तसंच नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले. 

त्यातच आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने नागरिकांमधील धास्ती आणखीच वाढली. त्यावर बोलताना मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही, असा खुलासा राजेश टोपे यांनी केला आहे. 

(viral audio clip is not mine says maharashtra health minister rajesh tope)

हेही वाचा- तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा