Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

आंदोनकर्त्या शिक्षकांच्या पाठिशी मनसे ठामपणे उभी- अमित ठाकरे

आपल्या विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली.

आंदोनकर्त्या शिक्षकांच्या पाठिशी मनसे ठामपणे उभी- अमित ठाकरे
SHARES

आपल्या विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी ठाम उभे आहोत, असं आश्वासन अमित ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं.

आंदोनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी सांगितलं की, आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न नेमके काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलो होतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला समजलं की जवळपास अडीच ते तीन हजार शिक्षक इथं आंदोलन करत आहेत. शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, परंतु अनुदानाचा प्रश्न हा त्यांचा मुख्य प्रश्न आहे. कोरोना काळात शिक्षक देखील अडचणीत आले असून हा अत्यंत गंभीर विषय आहे. शिक्षकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आम्ही इथं आलो आहोत. शिवाय पक्षाच्या शिष्टमंडळासह शिक्षणमंत्र्यांना देखील भेटलो. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा, अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. दरवर्षी २० टक्के अनुदान वाढवून देण्यात येईल, असं आश्वासन सरकारकडून शिक्षकांना देण्यात आलं होतं. परंतु मागील २ वर्षांपासून हे अनुदान देण्यात आलेलं नाही. अत्यंत तुटपुंज्या पगारात शिक्षकांना आपली गुजराण करावी लागत आहे. सरकार आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने नाईलाजाने शिक्षकांना आंदोलन पुकारावं लागलेलं आहे.

(mns leader amit thackeray meet teachers protesting at azad maidan)


हेही वाचा-

विधानसभा अध्यक्षपदावर केवळ काँग्रेसचाच हक्क- बाळासाहेब थोरात

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात कंगनाकडून याचिका मागे, पालिकेकडे केला अर्ज


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा