Advertisement

शिवनेरी किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी २३ कोटींचा निधी मंजूर

छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचं संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शिवनेरी किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी २३ कोटींचा निधी मंजूर
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचं संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  

यासंदर्भात अधिक माहिती देताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचं जतन, संवर्धन, सुशोभीकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. यासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल, असं ते म्हणाले.

हेही वाचा- ९०० कोटींचा सायबर क्राईम सिक्युरिटी प्रकल्प लवकरच- अनिल देशमुख

या निधीतून पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचं पुनरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचं पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी लँडस्केपींगची कामे आदी विविध कामे केली जाणार आहेत.

भविष्यात शिवनेरीप्रमाणेच राज्यातील (maharashtra) सर्व गडकिल्ल्यांचा त्यांचं ऐतिहासिक महत्त्व राखत पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल. या माध्यमातून शिवरायांचं कार्य देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक कार्य केलं जाईल, असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

(maharashtra government sanction 23 crore rupees for shivneri fort development says tourism minister aaditya thackeray)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा