Advertisement

९०० कोटींचा सायबर क्राईम सिक्युरिटी प्रकल्प लवकरच- अनिल देशमुख

महाराष्ट्रात वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ९०० कोटींचा सायबर क्राईम सिक्युरिटी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करू, असं गृहमंत्री म्हणाले.

९०० कोटींचा सायबर क्राईम सिक्युरिटी प्रकल्प लवकरच- अनिल देशमुख
SHARES

महाराष्ट्रात वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ९०० कोटींचा सायबर क्राईम सिक्युरिटी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करू. यामाध्यमातून सायबर क्राईम थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी दिली. सायबर क्राईम पोलीस ठाण्याच्या उद्घाटन कार्यक्रमात अनिल देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाने जग व्यापलेलं असताना ऑनलाईन माहितीची देवाण घेवाण, आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यानुसार दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यात आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होताना दिसते. जगभरात ५ ट्रिलियन डॉलरने सायबर गुन्हे वाढत आहेत. महाराष्ट्रातही हे प्रमाण आणि प्रकार वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आले आहेत. 

समाज माध्यमाचा वापर करून पोलिसांना, राजकीय व्यक्ती किंवा महिलांना बदनाम करण्याचं काम, अफवा पसरवण्याचं, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं. अशा घटना थांबवण्यासाठीही या ठाण्यांचा उपयोग होईल. फेक प्रोफाईल तयार करण्याचं प्रमाणही खूप वाढलं आहे, त्याकडे लक्ष देता येईल. मुंबईत कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे हा महत्त्वाचा विषय घेऊन महाराष्ट्र मुंबई पोलीस दल काम करत आहे. 

हेही वाचा- बदनामीने बेचैन होऊ नका, महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

पोलिसांसाठी घरे हा महत्त्वाचा विषय आहे, १ लाख घरे पोलिसांसाठी बांधता येतील. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. जो कुणी नियमाच्या बाहेर जाऊन काम करील त्यांना धडा शिकवण्याचं काम मुंबई पोलीस (mumbai policeकरतच राहील, असंही गृहमंत्री यावेळी म्हणाले. अँटी नार्कोटिक सेल अधिक सक्षम करण्याची गरज आहे, त्याचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वागत कक्ष निर्माण करून मार्गदर्शन करणार असल्याबद्दल मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं. पोलीस स्टेशनला फक्त गुन्हा घडल्यावरच लोक येत नाही. त्यांच्या काही अडचणी प्रश्न असतात, त्यांना बसून सांगता येईल अशी जागा नव्हती. स्वागत कक्षामुळे हा प्रश्न सुटल्याचं ते म्हणाले. जगभरात मुंबई पोलिसांचं नाव उंचावत ठेवण्यासाठी चे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह प्रास्ताविक करताना म्हणाले, डिजिटल इकॉनॉमी विकसित होत असताना सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. हे गुन्हे कुठेही बसून करता येतात. गेल्यावर्षी २५०० एफआरआर आणि १० हजार सायबर तक्रारी दाखल झाल्या. आतापर्यंत एकच सायबर पोलीस ठाणे बीकेसीत होतं. या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज होती. त्यामुळेच शहरात ५ सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले. 

या शिवाय ९४ पोलीस स्टेशनला स्वागत कक्षाचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन होत आहे. सर्वसामान्य माणसं जेव्हा पोलीस स्टेशनला येतात तेव्हा त्यांना त्यांचे प्रश्न व्यवस्थित मांडता यावेत यासाठी स्वागत कक्ष तयार करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा कक्ष त्यांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य करील, असं त्यांनी सांगितलं.

(cyber crime security project will complete soon in maharashtra says home minister anil deshmukh)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा