Advertisement

बदनामीने बेचैन होऊ नका, महाराष्ट्र पोलिसांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

कुणी कितीही बदनामी केली तरी बेचैन होऊ नका, त्यांचा बुरखा तुम्ही फाडला आहे. तुमचा अभिमान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बदनामीने बेचैन होऊ नका, महाराष्ट्र पोलिसांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला
SHARES

कुणी कितीही बदनामी केली तरी बेचैन होऊ नका, त्यांचा बुरखा तुम्ही फाडला आहे. तुमचा अभिमान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मुख्यमंत्री लोकप्रिय होत असेल तर त्याचे मानकरी पोलीससुद्धा आहेत, कारण कारभार कोण चालवतो यापेक्षा तो कसा चालतो याला जनता महत्त्व देते. सरकार ताकतीने तुमच्या मागे उभं आहे, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दक्षिण विभाग, पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस माझ्या मुंबई (mumbai police) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रुपाने उपलब्ध आहे, आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. सायबर क्राईम म्हणजे ई-दरोडा, खिडक्या तुटल्या नाही, दरवाजे तोडले नाही पण तिजोरी लुटली आहे. याला सायबर क्राईम म्हणतात. तो डोळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपलं युद्ध अधिक सक्षमतेने आता सुरु झालं आहे.

सायबर सेलसोबतची मूळ पोलीस ठाण्याची इमारत १०३ वर्षाची असली तरी आधुनिकतेकडे पाऊल टाकणारं सायबर पोलीस ठाणे सुरु केल्याने आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ झाला आहे. गुन्ह्यांचं स्वरूप बदलत आहे. मोबाईल फोनचा दुरुपयोग वाढतो आहे, आपल्याच साधनांचा उपयोग करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगाच्या पाठीवरचा कुणीही कुठेही बसून आपल्या घरातील माहिती, पैसे आणि इतर गोष्टींची चोरी या माध्यमातून करू शकतो, असं असलं तरी या गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारं मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले.

हेही वाचा- महाराष्ट्राने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी एकाचीच पद्मश्रीसाठी निवड

पोलिसांच्या घराचा प्रश्न आपण संपूर्णत: मार्गी लावणार आहोत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव समोर आणा आपण त्याला मंजुरी देऊ, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पोलीस स्वागत कक्षाच्या माध्यमातून  वेगळा अनुभव नागरिकांना अनुभवता येईल, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर जरब बसवायची असेल तर नागरिकांना पोलिसांची भीती वाटू नये. दरारा आणि दहशत यामध्ये फरक आहे. गुंडाची असते ती दहशत आणि पोलिसांचा असतो तो दरारा. उंदराच्या बिळात लपलेल्यांना शोधून काढून फासावर लटकवण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं आहे. हे काम जनतेचे आशीर्वाद घेण्याचं आहे.  

कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी झाले होते. याशिवाय मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, उपगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारीही कार्यक्रमास उपस्थित होते.

(cm uddhav thackeray praised maharashtra police)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा