Advertisement

महाराष्ट्राने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी एकाचीच पद्मश्रीसाठी निवड

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी केवळ एका व्यक्तीला म्हणजेच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्राने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी एकाचीच पद्मश्रीसाठी निवड
SHARES

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारने केली. यंदा ११९ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश असला, तरी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या ९८ नावांपैकी केवळ एका व्यक्तीला म्हणजेच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. इतर ९७ नावे केंद्राने विचारात घेतलेली नाहीत. त्यातही सिंधुताईंना पद्मभूषण देण्याची शिफारस केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविलं जाणार आहे.

रजनीकांत देवीदास श्रॉफ (पद्मभूषण), गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम आत्माराम गंगावणे, जसवंतीबेन पोपट, सिंधुताई सपकाळ (पद्मश्री) या ६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यातील केवळ सिंधुताई यांच्याच नावांची शिफारस राज्य शासनाने केली होती.

राज्य सरकारने पद्मविभूषण पुरस्कारासाठी जगप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांची नावं पाठवली होती. 

तर सिंधुताई सपकाळ, ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे सीईओ अदर पूनावाला, प्रोफेशनल स्कायडायव्हर शीतल महाजन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच केंद्राकडे पाठविण्यात आली होती. 

हेही वाचा- म्हणून शेतकरी शिष्टमंडळाला भेटलो नाही, राज्यपालांचा खुलासा

त्याशिवाय पद्मश्रीसाठी खा. संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, मधुकर भावे यांच्यासह मारुती चितमपल्ली, अनिरुद्ध जाधव, प्रकाश खांडगे, विजया वाड, सदानंद मोरे, शिवराम रेगे (मरणोत्तर), शं.ना. नवरे (मरणोत्तर), दीपक मोडक, विठ्ठल पाटील, शंकरराव काळे (मरणोत्तर), लक्ष्मीकांत दांडेकर, राधेश्याम चांडक, निरजा बिर्ला, राजश्री पाटील, धनंजय दातार, प्रभाकर साळुुंखे, उदय कोटक, विलास शिंदे, शशिशंकर (रवी) पंडित, उदय देशपांडे, प्रभात कोळी, खाशाबा जाधव (मरणोत्तर), अंजली भागवत, अजिंक्य राहाणे, युवराज वाल्मीकी, शंकर नारायण, स्मृती मानधना, वीरधवल खाडे, अशोक हांडे, रोहिणी हट्टंगडी, आरती अंकलीकर टिकेकर, अश्विनी भिडे देशपांडे, विठाबाई नारायणगावकर (मरणोत्तर), सत्यपाल महाराज, ऋतिक रोशन, रघुवीर खेडकर, सुबोध भावे, प्रेमानंद गज्वी, अशोक पत्की, अनिल मोहिले (मरणोत्तर), दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, राणी मुखर्जी, उद्धवबापू आपेगावकर, नागराज मंजुळे, गौतम राजाध्यक्ष (मरणोत्तर), रणवीरसिंग, मोहन जोशी, अशोक सराफ, राजदत्त, ऋषी कपूर (मरणोत्तर), अजय-अतुल, मुक्ता बर्वे, विक्रम गोखले, डॉ. अमोल कोल्हे, मिलिंद गुणाजी, पंडित अजय पोहनकर, जॉनी लिवर, डॉ. दुरू शहा, डॉ. ऋतुजा दिवेकर, मीनल भोसले, डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. चित्तरंजन पुरंदरे, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. राहुल पंडित, डॉ. सुरेश भोसले, डॉ. मुफझल लकडावाला, डॉ. प्रतीत समदानी, डॉ. हिंमतराव बावसकर, डॉ. सुलतान प्रधान, अफरोज शहा, दिनू रणदिवे (मरणोत्तर), एकनाथ ठाकूर (मरणोत्तर), जयंत बर्वे, संजीव उन्हाळे, आभा लांबा, विजयसिंह थोरात, गुलाबराव पाटील (मरणोत्तर), दीपक साठे (मरणोत्तर), हंसा योगेंद्र, रमाकांत कर्णिक अशा ८८ नावांची शिफारस राज्याकडून करण्यात आली होती.

(only one name selected for padmashree award from maharashtra )

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा