Advertisement

म्हणून शेतकरी शिष्टमंडळाला भेटलो नाही, राज्यपालांचा खुलासा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी शेतकरी शिष्टमंडळाची भेट न घेतल्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली. त्यावर राज्यपालांनी खुलासा करत शेतकरी शिष्टमंडळासोबत भेट का होऊ शकली नाही, या मागचं कारण सांगितलं आहे.

म्हणून शेतकरी शिष्टमंडळाला भेटलो नाही, राज्यपालांचा खुलासा
SHARES

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी शेतकरी शिष्टमंडळाची भेट न घेतल्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली. त्यावर राज्यपालांनी खुलासा करत शेतकरी शिष्टमंडळासोबत भेट का होऊ शकली नाही, या मागचं कारण सांगितलं आहे. 

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास २ महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी सोमवारी मुंबईतील (mumbaiआझाद मैदानात एकवटले होते. या मोर्चानंतर शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन त्यांनाआपल्या मागण्यांचं निवेदन देणार होतं. परंतु ही भेट होऊ शकली नाही. 

त्यावर राजभवनातून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटलं आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. २५ जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने राज्यपाल त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असं राजभवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आलं होतं. 

हेही वाचा- राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण…; शरद पवार संतापले

संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनंजय शिंदे यांना २२ जानेवारी रोजी दूरध्वनीद्वारे तसंच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना २४ जानेवारी रोजी लेखी पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेबद्दल कळविण्यात आलं होतं. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाद्वारे निरोप मिळाल्याचं मान्य केलं होतं. तसंच प्रकाश रेड्डी यांना याबाबतचं लेखी पत्र २४ जानेवारी रोजी प्राप्त झालं  होतं. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचं आहे, असं राजभवनातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवेदन स्वीकारतील असं देखील धनंजय शिंदे यांना पूर्वीच कळविण्यात आलं होतं व तसं स्वीकृत असल्याबद्दल त्यांनी संदेशाद्वारे कळवलं होतं, असं राजभवानातून सांगण्यात आलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी, तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. 

राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण ते थांबले नाहीत, असं म्हणत राज्यपालांवर टीका केली होती.

(maharashtra governor clarifies on meeting with farmers delegation)

हेही वाचा- तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावे करण्याचा डाव- बाळासाहेब थोरात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा