Advertisement

तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावे करण्याचा डाव- बाळासाहेब थोरात

जोपर्यंत केंद्र सरकार हे काळ कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या लढ्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शेती कायद्यांना विरोध केला.

तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावे करण्याचा डाव- बाळासाहेब थोरात
SHARES

भांडवलदारांसाठी काम करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही. काळे कायदे आणून हे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा भांडवलदारांच्या नावे करण्याचा डाव रचत आहे, परंतु जोपर्यंत केंद्र सरकार हे काळ कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या लढ्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी शेती कायद्यांना विरोध केला.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित 'संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाला' उपस्थित राहून बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले, काळे कृषी कायदे हे साठेबाज आणि भांडवलदारांसाठी आहेत. या विरोधात २ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं अभूतपूर्व आणि नवा इतिहास घडवणारं आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे. पण भांडवलदारांसाठी काम करणाऱ्या केंद्रातील भाजप (bjp) सरकारला शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही.

शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून आता तुमचा सातबारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा असून तो देशाला दिशादर्शक ठरणार आहे.

हेही वाचा- राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण…; शरद पवार संतापले

भाजपा सरकारने आणलेल्या काळ्या कायद्यांना काँग्रेसने (congress) सुरुवातीपासूनच विविध आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शवलेला आहे. महाराष्ट्रातही ट्रॅक्टर रॅली, किसान महाव्हर्च्युअल रॅली, आंदोलने, मोर्चा, राजभवनला घेराव घातला. देशभरातून दोन कोटी सह्यांचे निवेदनही राष्ट्रपतींना दिले आहे. काँग्रेस पक्ष या संघर्षात शेतकऱ्यांसोबत असून सरकार काळे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहू, असं आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी दिलं.

काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून महाराष्ट्रात (maharashtra) शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, त्यासंदर्भात चर्चा सुरु असून लवकरच कायदा केला जाणार आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

(maharashtra congress president balasaheb thorat backs farmers rally in mumbai)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा