Advertisement

राज्यातील सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गटारगंगा- देवेंद्र फडणवीस

राज्यातील हे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गटारगंगा आहे. या सरकारने अनेक योजनांना स्थगिती दिली. केवळ एकच योजना सुरू आहे, ती म्हणजे भ्रष्टाचार, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

राज्यातील सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गटारगंगा- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्यातील हे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गटारगंगा आहे. या सरकारने अनेक योजनांना स्थगिती दिली. केवळ एकच योजना सुरू आहे, ती म्हणजे भ्रष्टाचार, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. 

जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या १० निर्दोष बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करा, या व अशा अनेक मागण्यांसंदर्भात सोमवारी भंडारा जिल्हा भाजपने मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केलं. या मोर्चाला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. परिणय फुके आणि इतरही नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, भंडार्‍यात १० निष्पाप बालकांचा जीव गेल्यानंतरही राज्य सरकारचा नाकर्तेपणा कमी झालेला नाही. दूध, धान उत्पादक आणि शेतकर्‍यांचे विविध प्रश्न अजूनही प्रलंबितच आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दीड वर्षांपासून थकित असलेले चुकारे सरकारने त्वरित द्यावेत, धानखरेदीतील भ्रष्टाचार थांबवावा, कामगारांना कल्याण योजनेचा लाभ द्यावा, कोरोना काळातील वीजबिल कमी करावं, पूरपीडितांना योग्य मदत द्यावी, नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना योग्य मदत मिळावी, अशा मागण्या सातत्याने करूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

हेही वाचा- राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण…; शरद पवार संतापले

आमच्या सरकारच्या काळात दुधाला अनुदान देण्यात आलं. पण, आज दुधाचे पैसेच दिले जात नाहीत. वीजबिल माफीची घोषणा तर सरकारच्या मंत्र्यांनीच केली. पण, आज ते घूमजाव करतात. गरिबांना देण्यासाठी १२०० कोटी नाहीत आणि मुंबईच्या बिल्डरांना ५ हजार कोटींची सवलत दिली. पूर्व विदर्भाच्या ६ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना या सरकारने एकूण ११ कोटी रूपये दिले. आज कित्येक शेतकरी अर्ज करून हैराण आहेत, पण त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. हे बांधावर जाऊन आश्वासने देणारे आज शेतकर्‍यांना कवडीची मदत करीत नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

बेईमानीने आलेल्या सरकारचा मुकाबला आता रस्त्यावर करावा लागेल. जे कायदे सर्वांत आधी महाराष्ट्राने (maharashtra) केले, तेच कायदे आता देशात झाले, तर हे ढोंगीपणा करतात. १० बालकांच्या मातांचे अश्रू अजूनही सुकले नाहीत. भंडार्‍यातून घालवता आणि वर्ध्यात रूजू करून घेता, हीच का तुमची संवेदनशीलता? ६ महिने मंत्रालयात फाईलवर बसून राहिले नसते, तर आज ही वेळ आली नसती. हा अपघात नाही, राज्य सरकारच्या चुकीमुळे हे मृत्यू झाले आहेत. 

वीजेचं कनेक्शन कापण्यासाठी गावात कुणी आलं, तर त्याला एक गुलाबाचं फूल द्या आणि त्यांना गाडीत बसवून परत पाठवा. कुणाचीही वीज कापण्याची सक्ती कुणाला करू देणार नाही, ही जबाबदारी भाजपच्या (bjp) कार्यकर्त्यांची, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

(maharashtra opposition leader devendra fadnavis slams maha vikas government over children deaths in bhandra fire)

हेही वाचा- मुंबई काँग्रेसला राखायचंय विरोधीपक्ष नेतेपद!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा