Advertisement

“मातृभाषेतून वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था उभारा”

महाराष्ट्राने तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या करण्यासाठी पुढाकर घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

“मातृभाषेतून वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था उभारा”
SHARES

मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्राने तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या करण्यासाठी पुढाकर घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणामध्ये देशभरात मातृभाषेतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या कराव्यात, असं आवाहन देशाला केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने तातडीने अशा दोन संस्था उभ्या करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि कुसुमाग्रज यांच्या जन्मभूमीत होत आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी भाषेतील योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन १०० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यापूर्वी मराठी भाषेतून शिक्षण देणाऱ्या तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण संस्था उभ्या राहिल्यास भाषेचा आणि महाराष्ट्राचा सन्मानच होईल. 

हेही वाचा- अजूनही काँग्रेस नेहरू मनोवृत्तीतून बाहेर पडलेली नाही- आशिष शेलार

त्याचसोबत महाराष्ट्राचा (maharashtra) ७५ वा वर्धापन दिन आपण ज्यावेळी साजरा करू त्यापूर्वी या दोन संस्था उभ्या राहिल्यास मराठी भाषेला एक वेगळा आयाम मिळू शकेल. 

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि मातृभाषेचा सन्मान, प्रसार व प्रचार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यांना केलेलं हे आवाहन एका अर्थी एक मोठी संधी आहे. त्यामुळे तातडीने या दृष्टीने पावलं उचलणं आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत याबाबतही तातडीने केंद्र सरकारशी संवाद साधणं आवश्यक आहे. 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर व्यावसायिक उपयोगासाठी निश्चित केलेल्या जागेवर या संस्था उभ्या राहिल्यास तातडीने जागा उपलब्ध होताना कनेक्टिव्हिटी देखील होऊ शकेल. व्हिजेटीआय-आयआयटी, जे जे, केईएम यांसारख्या नामांकीत संस्थांशी समन्वय साधून मातृभाषेतून शिक्षणासाठी मदत घेतल्यास अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीकडून मातृभाषेची सेवा घडेल.

मातृभाषा ही ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन हे महत्त्वाचं ठरणारं आहे. त्यामुळे यादृष्टीने शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. 

(maharashtra government should give technical and medical education in marathi demands bjp mla ashish shelar)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा