Advertisement

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी ‘अशी’ तयारी- अशोक चव्हाण

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल. त्या दृष्टीने राज्य शासनाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी ‘अशी’ तयारी- अशोक चव्हाण
SHARES

मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झालं आहे. हे आरक्षण टिकलं पाहिजे, हीच सर्वांची भूमिका आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल. त्या दृष्टीने राज्य शासनाने पूर्ण (maharashtra government well prepare for supreme court hearing on maratha reservation says ashok chavan) तयारी केली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिका आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक शनिवारी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ विधीतज्ज्ञ मुकुल रोहतगी, ज्येष्ठ काऊन्सिल पटवालिया, राज्य शासनाच्या वतीने अॅडव्होकेट साखरे, दिलीप चिटणीस यांच्यासह मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आणि मी स्वतः उपस्थित होतो, अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचा - Maratha Reservation: मराठा आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी सरकारची भक्कम तयारी- अशोक चव्हाण

राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर काही जणांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यावर येत्या ७ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून ही पाचवी ते सहावी बैठक आहे. या बैठकीत सर्व बाजूच्या, तयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. ७ जुलैला सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होईल, त्या सुनावणीत शासनाच्या वतीने बाजू व्यवस्थितरित्या मांडली जाईल. मराठा आरक्षण कुठल्याही परिस्थितीत टिकलं पाहिजे, त्यासाठी हा सर्व आमचा प्रयत्न आहे. जी काही बैठकीत चर्चा झाली, त्यासंदर्भात खासदार संभाजीराजे यांनासुद्धा अवगत करण्यात आलं आहे. शरद पवार यांना देखील सर्व माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

राज्य शासनाने याबाबत अत्यंत भक्कम तयारी केलेली आहे. मराठा आरक्षणाबाबत काहीही बैठक नाही, चर्चा नाही अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात काहीही तथ्य नाही, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - हे सरकार शंभर टक्के मराठाविरोधी, नितेश राणेंची सरकारवर टीका

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा