Advertisement

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, राज्यपालांचं सत्ताधाऱ्यांना पत्र

काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार, अशी विचारणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र पाठवून केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, राज्यपालांचं सत्ताधाऱ्यांना पत्र
SHARES

काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार, अशी विचारणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र पाठवून केली आहे. त्यावर महाविकास आघाडीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकण्याचं सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे.

रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर घ्यावी, असं पत्र भगत सिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठविलं आहे. अध्यक्षांची निवडणूक कधी घ्यायची याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन तो राज्यपालांना कळवण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना यादी पाठवून देखील विधान परिषदेतील रिक्त १२ जागांवर सदस्यांची निवड होत नसल्याने महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात मागील काही महिन्यांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राज्यपालांना सरकारी विमान वापरण्यास मनाई केल्यापासून या वादात भर पडली आहे. हे लक्षात घेता राज्यपालांकडून अशा प्रकारचं पत्र येईल, हे सत्ताधाऱ्यांनी गृहीतच धरलेलं होतं.

हेही वाचा- दादांच्या मनातलं ओळखणारी भाषा शिकायचीय- उद्धव ठाकरे

यापार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनच्या अखेरच्या टप्प्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत विचार सुरू केला आहे. विरोधक मतं फोडण्यात यशस्वी झाल्यास नाहक अडचण येऊ शकते, हे लक्षात घेऊन गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने निवड करता येते का, याचीही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्लाही घेण्यात येत आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत राज्यपालांनी पत्र पाठविलं असलं तरी राज्यपालांनी विधान परिषदेवर रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीकडेही लक्ष द्यावं, असं वक्तव्य विधिमंडळ कामकाजमंत्री अनिल परब (anil parab) यांनी केलं.

तर दुसऱ्या बाजूला हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसत आहे. आपल्याच आमदारांना इतकं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहात आहे. आपला उमेदवार पडतोय की काय, याचीच सरकारला जास्त भीती आहे. पण चांगलं आहे. यामुळे आमचं मनोरंजन होतं आहे आणि आमदारांचं भलं होतं आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी लगावला.

(maharashtra governor bhagat singh koshyari ask about vidhan sabha president election)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा