Advertisement

सत्ताधारी पक्षांच्या मोर्च्यांना सूट आणि शिवजयंतीवर निर्बंध!- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सत्तारूढ पक्षाचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षाचे मोर्चे जोरात, असं असताना केवळ शिवजयंतीवरच निर्बंध का? असा प्रश्न विचारत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

सत्ताधारी पक्षांच्या मोर्च्यांना सूट आणि शिवजयंतीवर निर्बंध!- देवेंद्र फडणवीस
SHARES

महाराष्ट्रात सत्तारूढ पक्षाचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षाचे मोर्चे जोरात, असं असताना केवळ शिवजयंतीवरच निर्बंध का? असा प्रश्न विचारत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. नागपूरमध्ये शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस (devendra fadnavis) यांनी ही टीका केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. आज आपण भारतात हिंदू म्हणून भारतीय म्हणून जगतोय त्यामागचं एकमेव कारण हे छत्रपती शिवराय आहेत. शिवरायांची जयंती ही प्रेरणाकुंज म्हणून काम करते. असं असूनही शिवजयंतीवर निर्बंध टाकायचे हे अतिशय चुकीचं आहे. कोरोनाच्या संदर्भात सगळ्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे आम्हाला मान्य आहे. परंतु याबाबतच्या नियमांची आठवण केवळ शिवजयंतीलाच का व्हावी. हेच नियम सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या मोठ्या मेळाव्यांना का लागू होऊ नये, असा आमचा प्रश्न आहे.

हेही वाचा- दादांच्या मनातलं ओळखणारी भाषा शिकायचीय- उद्धव ठाकरे

राज्यात ज्या प्रकारचे निर्णय सरकार घेत आहे, मग ते शिवजयंतीवर निर्बंध टाकण्याचे असोत किंवा ७५ लाख लोकांचं वीज कनेक्शन कापण्याचे असोत, मोगलाई यापेक्षा वेगळी काय होती? रयतेच्या राज्यामध्ये खरं तर लाॅकडाऊननंतर जनतेच्या पाठिशी उभं राहायचं सोडून त्यांचे वीजेचं कनेक्शन हे सरकार कापत सुटलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, संविधानात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की, अध्यक्षाचं पद रिकाम होताच राज्यपालांची जबाबदारी आहे की त्यांनी अध्यक्षांच्या निवडीसाठी तारीख निश्चित करावी. या तारखेला गुप्त मतदानाद्वारे विधानसभा अध्यक्षांची निवड व्हावी. तसं करायचं नसेल, तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नसल्याचं सांगा.

(maharashtra opposition leader devendra fadnavis criticized maha vikas aghadi government over restrictions on shivjayanti)

हेही वाचा- राज्यपालांकडून शिवरायांना अभिवादन, शिवाजी पार्क जिमखान्यालाही भेट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा