Advertisement

राज्यपालांचं उद्धव ठाकरेंना पुन्हा पत्र, ‘हे’ तीन मुद्दे केले उपस्थित

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहून राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यपालांचं उद्धव ठाकरेंना पुन्हा पत्र, ‘हे’ तीन मुद्दे केले उपस्थित
SHARES

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहून राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर हे पत्र राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळासह २३ जून रोजी राजभवन इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दोन निवेदनं सादर केली होती. यामध्ये प्रामुख्याने ओबीसी आरक्षण आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक हे दोन महत्त्वाचे मुद्दे होते.

या अनुषंगाने राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात नमूद केलं आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवन इथं भेट घेऊन दोन निवेदने मला सादर केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर आग्रही मागणी केली आहे.

हेही वाचा- ‘त्या’ प्रत्येक जागेवर ओबीसी उमेदवार, भाजपचा निर्णय

विधानमंडळाचं अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेण्याबाबत, विधानसभा अध्यक्षांचं संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत आणि राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत न घेण्याबाबत  

उपरोक्त तिन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे असल्याने याबाबत आपण यथोचित कार्यवाही करावी व मला त्याबाबत अवगत करावं, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सरकारने निवडणुका घेऊ नयेत. जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढं ढकलाव्यात आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी सातत्याने भाजपकडून राज्य सरकारला करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून भाजपने चक्का जाम आंदोलन देखील केलं. 

(Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari writes letter to CM Uddhav Thackeray on obc reservation and holding Assembly Speaker's election)

हेही वाचा- केंद्राच्या भूमिकेमुळेच ओबीसींचं नुकसान, छगन भुजबळ यांचा आरोप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा