Advertisement

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’वरून देता येईल निवडणूक खर्चाचा तपशील

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’वरून देता येईल निवडणूक खर्चाचा तपशील
SHARES

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना  ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त समजलं जातं.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मदान यांनी सांगितलं की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणं बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते. त्यादृष्टीने उमेदवारांच्या सोयीसाठी राज्य ‍निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे; परंतु याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करण बंधनकारक आहे.

हेही वाचा- मनसेचं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक खर्च सादर करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना केली होती. त्यादृष्टीने ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ उपयुक्त ठरत आहे. त्याचा वापर २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

यात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याबरोबरच मतदार यादीत नाव शोधणं, मतदान केंद्राचं ठिकाण शोधणं, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातीला माहिती जाणून घेणं आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मतदार यादी बनवणं, मतदान केंद्रांचा नकाशा तयार करणं, महत्वाचे अहवाल सादर करणं, मतदानाची आकडेवारी देणं आदी सुविधा आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका लढविलेल्या ८० हजार उमेदवारांनी देखील हे ॲप डाऊनलोड केलं आहे, असंही मदान यांनी सांगितलं.

(maharashtra gram panchayat election candidate can declare their property through true voter app)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा