Advertisement

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करणार- अनिल देशमुख

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करणार- अनिल देशमुख
SHARES

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवार ८ सप्टेंबर रोजी विधानसभेत दिली. (maharashtra home minister anil deshmukh orders investigation of anvay naik suicide case)

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन दिलं. त्यांच्या निवेदनास उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते. यावेळी सदस्य सुनिल प्रभू, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनीही गुन्हेगारास तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

काय आहे अन्वय नाईक प्रकरण?

पेशाने वास्तुविशारद असलेले अन्वय नाईक कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी मे २०१८ मध्ये अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. तसंच त्यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं. त्यांनर अन्वय नाईक यांच्या पत्नीने अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा - 'त्या' वरिष्ठ पञकाराच्या अडचणीत वाढ, अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे

परंतु गुन्हा दाखल होऊनही पुढं काहीच कारवाई होत नसल्याने अक्षता नाईक यांनी मे २०२० मध्ये सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करत न्यायाची मागणी केली होती. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. परंतु अर्णब गोस्वामी यांनी या कामाचे पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अक्षता नाईक यांनी केला होता.

मात्र अर्णब गोस्वामी यांच्या एआरजी आऊटलायर मीडिया कंपनीने अक्षता नाईक यांचे आरोप फेटाळून लावले. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेडसोबतचा सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला असून, त्याची कागदपत्रंही आमच्याकडे आहेत. अक्षता नाईक सत्य मोडून-तोडून सादर करत असल्याचं एआरजी आऊटलायर मीडिया कंपनीने म्हटलं होतं.

या प्रकरणाची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं होतं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा