Advertisement

शरद पवार, अनिल देशमुखांनाही धमकीचे फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अज्ञात व्यक्तीने फोन काॅल करून धमकी दिल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार, अनिल देशमुखांनाही धमकीचे फोन
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचा फोन आल्याची घटना समोर येऊन काही तास होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अज्ञात व्यक्तीने फोन काॅल करून धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांकडून तरी अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. (sharad pawar and anil deshmukh gets threatening calls from unknown person)

एका बाजूला राज्याचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानीही धमकीचे फोन आल्याने चिंता वाढली आहे. हे फोन विदेशातून आल्याचं समजत आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांना कळवण्यात आलं असून त्यांनी तपास सुरू केल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- मातोश्री बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, दुबईतून आले ४ फोन काॅल

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन काॅल आल्याने एकच खळबळ माजली होती. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आपण दाऊदचा हस्तक असल्याचं सांगितलं होतं. तसंच हा फोन काॅल दुबईहून करण्यात आला होता. मातोश्री निवासस्थानी असलेल्या पोलीस आॅपरेटरने हा काॅल घेतल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे, असं समोरची व्यक्ती म्हणाली होती. हा काॅल आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. तसंच पोलिसांनी देखील तपासकार्याला सुरूवात केली. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील या धमकीच्या फोन काॅलची गंभीर दखल घेण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली होती.

त्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याने पोलीस यंत्रणा आणखीनच सतर्क झाली आहे.  

हेही वाचा- कंगना रणौतविरोधात मुंबईत तक्रार दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा