Advertisement

Coronil: गृहमंत्र्यांचा बाबा रामदेवांच्या पतंजलीला सज्जड दम, म्हणाले...

कोरोना हा संसर्गजन्य आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या कोरोनिल औषधाची विक्री वा जाहिरात महाराष्ट्रात केली, तर ताबडतोब कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला दिला आहे.

Coronil: गृहमंत्र्यांचा बाबा रामदेवांच्या पतंजलीला सज्जड दम, म्हणाले...
SHARES

कोरोना हा संसर्गजन्य आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या कोरोनिल औषधाची विक्री वा जाहिरात महाराष्ट्रात केली, तर ताबडतोब कारवाई करण्यात (maharashtra home minister anil deshmukh warns patanjali over coronil drug sale or advertisement) येईल, असा सज्जड दम राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला दिला आहे. 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यासंदर्भात म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन कोरोनिल या औषधाची जाहिरात केली. या औषधामुळे कोरोना हा आजार बरा होईल, असा दावा देखील त्यांनी केला. परंतु ज्या औषधांची पतंजली कंपनीकडून जाहिरात करण्यात येत आहे, त्या औषधासाठी केंद्र सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाकडून कंपनीने परवानगी घेतलेली नव्हती, असं पुढं आलं आहे. या औषधाची क्लिनिकल ट्रायलही घेण्यात आली नाही, या औषधाला इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल सायन्सचीसुद्धा परवानगी नसताना देखील ज्याप्रकारे पतंजलीने या औषधाची जाहिरातबाजी केली, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जर पतंजलीने कोरोनिल औषध घेतल्याने कोरोना बरा होतो असा दावा करत जर या औषधाची जाहिरात वा विक्री केली, तर नियमानुसार कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल,असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. 

हेही वाचा - Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

आयुषची नोटीस

रामदेव बाबांनी कोरोनावर औषधं शोधल्याचा हा दावा (Ayurvedic medicine) केल्यानंतर आयुष मंत्रालयानं (Ministry of AYUSH)त्याची गंभीररित्या नोंद घेतली आहे. यासंदर्भात पतंजलीला नोटीस (Notice) देखील बजावण्यात आली आहे.

पतंजलीच्या (Patanjali) औषधांबद्दल आपल्यापर्यंत कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचं आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे. अशाप्रकारची औषधं शोधल्याचा दावा करण्याची जाहिरात (advertisements)करणं हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज म्हणजेच आक्षेपार्य जाहीरात (Drugs and Magic Remedies) १९५४ या कायद्याचा भंग आहे. तसंच, कोव्हिड-19 उद्रेकानंतर केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नियमांचाही यातून भंग करण्यात आला आहे.

औषधांच्या निर्मितीचा दावा करणाऱ्या कंपनीला याबद्दल सूचित करण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तसंच, संबंधित औषधांचं संशोधन कार्य तपासण्याबद्दल कंपनीला नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीकडून या औषधांची संपूर्ण माहिती, त्याबद्दलचं संशोधन, किती रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली त्याची संपूर्ण माहिती, CTRI नं याची काय नोंद केली आणि कोणत्या रुग्णालयात हे उपचार करण्यात आले यासंबंधीची सगळी माहिती आयुष मंत्रायानं मागवली आहे.  

हेही वाचा - Ramdev Baba : पतंजलीच्या कोरोनील औषधाबद्दल जाणून घ्या ‘या’ १३ गोष्टी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा