Advertisement

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड रुग्णालयात

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांना मंगळवारी रात्री उशिरा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात आलं आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड रुग्णालयात
SHARES

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांना मंगळवारी रात्री उशिरा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात आलं आहे. त्यांना आधी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांची प्रकृती खालावल्याने पहाटेच्या सुमारास फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आलं.

कोरोना रुग्णाच्या संपर्कात

लाॅकडाऊनमुळे (lockdown) अडचणीत आलेल्या कळवा-मुंब्रा परिसरातील रहिवाशांसाठी आव्हाड यांच्यामार्फत ‘कम्युनिटी किचन’ चालवण्यात येत होतं. तसंच त्यांना दैनंदिन उपयोगाच्या जीवनावश्यक वस्तू, धान्य देखील वाटण्यात येत होतं. त्यातच आव्हाड यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ताफ्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होताच आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना चाचण्या (corona test) केल्या होत्या. तर खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड यांनी स्वत:चं विलगीकरण करून घेतलं होतं. त्यानंतर  हा चाचणी अहवाल नकारात्मक आल्याचं सांगत आपण लवकरच पुन्हा मैदानात उतरून लोकांची मदत करू, असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा- जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ जणांना कोरोना

तब्येत बिघडली

परंतु, मंगळवारी सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होतं. रात्री उशिरा त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु तिथं प्रकृती खालावल्याने त्यांना पहाटेच्या सुमारास मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांना कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आव्हाड यांच्यावर ज्युपिटरमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचं सूत्रांकडून कळत असलं, तरी त्याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. रुग्णालय व्यवस्थापन, ठाणे महापालिका तसंच राज्य सरकारकडून त्यांच्या अहवालाविषयी कमालिची गुप्तता पाळण्यात येत आहे. 

दरम्यान आव्हाड यांच्यासोबत काम करत असलेल्या ठाण्यातील राष्ट्रवादीचे काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनाही विविध रुग्णालयांमध्ये कोरोना कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

आव्हाड यांना सोलापूर पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं असून त्यांच्याऐवजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा- अभियंता मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांना झटका, हायकोर्टाचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे निर्देश


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा