फेरीवाला मुक्त स्टेशनसाठी मनसेचे पथनाट्य


SHARE

मुंबई फेरीवाला मुक्त व्हावी, किमान रेल्वे परिसरातील फेरीवाले हटवले जावेत याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5 ऑक्टोबरपासून विशेष मोहिम राबवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे संताप मोर्चा, मनसे मूक आंदोलन आणि आता पथनाट्यातून जनजागृती या विशेष कार्यक्रमांचे आयोजन मनसे अध्यक्ष आणि कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत.

सोमवार 13 नोव्हेंबर रोजी दादरच्या सुविधा स्टोअर्ससमोर रेल्वे परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मनसेने पथनाट्याचे आयोजन केले होते. पथनाट्याच्या माध्यमातून यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी केलेले आंदोलन, फेरीवाल्यांमुळे प्रवाशांचा गुदमरून गेलेला श्वास, प्रवाशांना त्रासदायक ठरणारे मुजोर फेरीवाले असे विविध विषय कलाकारांनी मांडले.


लोकांनी खरेदी केली नाही, तर फेरीवाले बसणार नाहीत. म्हणून सनदशीर मार्गाने जनजागृती करण्यासाठी पथनाट्य आयोजित केले आहे. फेरीवाल्यांची संख्या वाढण्याला शिवसेना जबाबदार आहे. त्यांनी आपल्या स्वार्थासाठी फेरीवाला सर्व्हे केला नाही. शिवसेनेचे हप्ते बंद झाल्यामुळे त्यांना आता मराठी फेरीवाले आठवत आहेत.

यशवंत किल्लेदार, विभाग अध्यक्ष, दादरहेही वाचा

महापालिकेला आली जाग, 'ना फेरीवाला क्षेत्र'चे लावले बॅनर!


संबंधित विषय